योग्य वेळ-2

तिकडे बहिणी काम करत होत्या पण आवाज हॉल पर्यंत ऐकू येत होता..

गप्पा मारून झाल्या, मोहन पेपर चाळू लागला आणि ललित मोबाईल स्क्रोल करू लागला..

बहिणींच्या गप्पा कानावर ऐकू येत होत्या,

लहान बहीण चिडचिड करत होती,

“ही काय गं कोथिंबीर काळी पडली? आजकाल फ्रेश भाजीपाला येतच नाही..”

“अगं इतकी काही खराब नाही झालेली, होईल बरोबर..”

“आमच्या इथे तर भाजीवाले येतच नाही, यांना सांगावं तर एक भाजी धड आणतील तर खरं..”

“अगं आमच्या यांनाही कुठे जमतं? मीच जाते त्यांना सोबत घेऊन”

इकडे दोघे नवरे एकमेकांकडे बघून हसत होते,

ललितने मोबाईल बाजूला ठेवला आणि मोहनला बोलू लागला..

“भाऊ एक गोष्ट बोलू? म्हणायला गेलं तर दोघी सख्ख्या बहिणी, पण स्वभावात जमीन अस्मान चा फरक..मोठ्या दीदी अगदी शांत, समंजस…आणि आमची ही, सतत चिडचिड.. वय वाढलं तशी जास्त चिडचिड करते..कुठल्याही गोष्टीवरून माझ्यावर खेकसते, कधी सरळ संवाद करतच नाही…”

मोहन हसला, म्हणाला..

“अहो मला तर समजलं होतं की मोठी बहीण अगदी तापट आणि लहान बहीण अगदी शांत आहे म्हणून..”

“नाही हो, म्हणजे जेव्हापासून मी दोघींना बघतोय तेव्हापासून असं काही वाटलं नाही मला..”

मोहनने पेपर शांतपणे बाजूला ठेवला,

“भाऊ एक बोलू? म्हणजे राग येऊ देऊ नका पण माणसाचे स्वभाव परिस्थितीनुसार बदलत जातात..”

“म्हणजे?”

“म्हणजे जेवढं मला माहित आहे, हिच्या लहान बहिणीला लग्नानंतर खूपच बंधनं आणि मानसिक त्रास सहन करावा लागलेला..”

“जुन्या गोष्टी आहेत या..मीच काय करणार सांगा बघू, आमचं एकत्र कुटुंब… मला सर्वांची मर्जी राखण्यासाठी बायकोला धाकात ठेवणं भाग होतं..”

****

भाग 3

योग्य वेळ-3

1 thought on “योग्य वेळ-2”

Leave a Comment