मिस परफेक्ट (भाग 5)

bindhast girl, daughter in law india, funny lady, must read marathi story,
Marathi story

माधवी ने चोराला अशा प्रकारे पिटाळलं की घरातली एकही वस्तू गेली तर नाहीच, पण उलट चोराच्याही वस्तू माधवी ने आपल्याकडे ठेऊन घेतल्या…

माधवी चा नोकरीवर जायचा दिवस उजाडला…छान तयारी करून डबा बांधून ती नोकरीवर गेली. तिथे पाय ठेवताच तिला भांडणाचा आवाज ऐकू आला…आत जाऊन बघते तर एक कलाइन्ट त्याचे पैसे मिळत नाहीये म्हणून भांडण करत होता…

“हे बघा साहेब, आपण import export चं काम बघतो, तुमचा माल आम्ही on demand विकत घेतो..आणि ग्राहकांकडून पैसे मिळाले की मग ते आम्ही तुम्हाला देतो..यावेळी ग्राहकांनी मागणीच केली नाहीये, आम्ही कसा माल घेऊ तुमच्याकडुन आणि कुठले पैसे देऊ??”

“ते मला माहित नाही..तुमच्यासोबत मी कित्येक वर्षे काम करतोय, माझा माल तुम्ही विकत घ्यायलाच पाहिजे..”

“सर डिमांडच नाही तर कसा घेणार?? आणि पैसे कसले देऊ??”



“तुम्ही तो माल विका नाहीतर फेका..तुमच्याशी माझं tieup आहे…तुम्हाला माल घ्यावाच लागेल..”

“असा कुठलाही नियम नाहीये सर…तुमच्याशी व्यवहार करतेवेळीच तुम्हाला मी स्पष्ट सांगितलं होतं…”

माधवी ते बघते, आणि दारातच उभी राहून आवाज देते..

“हॅलो सर…मी माधवी…सेल्सवुमन..आमच्याकडे काही प्रोडक्टस आहेत…”

“बाहेर व्हा..आम्हाला वेळ नाही…आणि ही काय जागा आहे माल विकण्याची??” कलाइन्ट म्हणतो..

बॉस तिला ओळखतो.पण तिचा इरादा ओळखून मुद्दाम गप बसतो..

“सर एकदा बघा तर खरं… हे बघा, मार्केट मध्ये तुम्हाला हा मोबाईल 20000 ला मिळेल, आम्ही फक्त 5000 मध्ये विकतोय…”

कलाइन्ट लालची असतो…

“बघू??” माधवी तिचा स्वतःचा नुकताच घेतलेला मोबाईल काढून दाखवते..

“खरंच हा ओरिजनल फोन आहे…पण इतक्या कमी किमतीत?”

“आम्ही डायरेक्ट कंपनीतून विकत घेतो…हे बघा, कंपनीची ओरिजनल बॅटरी…ओरिजनल लोगो..”

कलाइन्ट ला खात्री पटते, तो लगेच विकत घ्यायला तयार होतो…

“मी घेतो हा मोबाईल…”

“ठीक आहे, 5 हजार द्या…”

कलाइन्ट पटकन पैसे काढून माधवी च्या हातात देतो…

माधवी पैसे मोजून घेते अन मोबाईल परत आपल्या खिशात ठेवते..अन पाठमोरी फिरते…

“अहो मॅडम मोबाईल??”

“कसला मोबाईल??”

“मी पैसे दिले तुम्हाला मोबाईल विकत घेतल्याचे…”

“कधी? तुम्हाला दिसलं मी पैसे घेताना?” माधवी तिथे असलेल्या लोकांना विचारते..
ते नाही म्हणून मान हलवतात…त्यांना माधवी चा मनसुबा समजलेला असतो…

“थांबा मी पोलिसात तक्रार करतो..मला वेड्यात कढताय का सगळे??”

“मग तुम्ही तरी दुसरं काय करताय साहेब?”

“म्हणजे?”

“जो माल विकलाच गेला नाही त्याचे पैसे मागताय…आणि माल विकत घ्यायलाच पाहिजे अशी बळजबरी करताय…”

“तुम्ही कोण?”

“मी मिस माधवी.. या कंपनीची नवीन एम्प्लॉयी…आजच जॉईन झालेय…”

कलाइन्ट खजील होऊन तिथून निघून जातो..
माधवी त्याच्या पाठोपाठ जाते..

“साहेब..काहीतरी मजबुरी असल्याशिवाय तुम्ही इतके आक्रमक होणार नाही..काय अडचण आहे मला सांगा..”

कलाइन्ट रडकुंडीला येतो..

“माझा माल 2 महिन्यापासून विकला जात नाहीये…कंपनी बंद करायची वेळ आलीये माझ्यावर…घरातले पैसे संपत चालले आहेत…काय करू अश्यावेळी? माझं स्वतःवरच कंट्रोल राहिलेलं नाही आता..”

“बरं…काय विकता तुम्ही??”

“कापडाचा व्यवसाय आहे…”

“फक्त कापड विकता?”

“हो..”

“मग एक काम करा फक्त…तो कपडा काही डिझायनर्स ला द्या…त्याचे ड्रेसेस, साड्या, रुमाल, पडदे, बेडशीट असे सर्व प्रकार तयार करून ते विका…”

“पण त्याला पैसे लागतील…माझ्याकडे तर काहीच नाहीये…”

माधवी त्याच्या गळ्यातली सोन्याची चेन बघते..

“तुम्हाला चेन प्रिय आहे की तुमचा आत्मसन्मान??”

कलाइन्ट ला जे समजायचं ते समजतं..

“मी नक्की याचा प्रयत्न करतो..खूप खुप आभार..”

कलाइन्ट निघून जातो…

इकडे माधवी चं कंपनीत जोरदार स्वागत होतं…

तिला काम समजावून देण्यात येतं…
या काळात ती ऑफिस च्या चुकीच्या सवयी observe करते..
ऑफिस सुटायची वेळ होते अन माधवी निघायला लागते, ऑफिस मधले सर्वजण तिच्याकडे पाहायला लागतात..

“काय? ऑफिस सुटलं…निघायची वेळ झाली..”

“माधवी, अगं असं चालत नाही..बॉस गेल्याशिवाय इथून कुणीही निघत नाही..”

“असं कसं? वेळ काळ पाळतात की नाही तुम्ही लोकं?”

“हे असंच चालत आलंय..”

“बघते कसं चालू राहतं ते..”

क्रमशः



3 thoughts on “मिस परफेक्ट (भाग 5)”

  1. तुमच्या बऱ्याच मार्च च्या पोस्त नाही दिसत। लिंक्स ऍक्टिव्ह नाहीयेत किंवा acccount suspend दाखवतो। तू।ही छान लिहिता। मला तुमच्या जुन्या पोस्ट वाचायच्या असतात पण बऱ्याचदा उपलब्ध नाही होत। ही कथा मिस परफेक्ट पण नाही भेटत आहे पूर्णपणे वाचायला। आशा आहे तुम्ही उत्तर द्याल।

    Reply

Leave a Comment