मिस परफेक्ट (भाग 4)

 “माफ कर मला…पुन्हा असा आगाऊपणा मी करणारच नाही..कानाला खडा..”

इतक्यात तुषार वर्तमानपत्र घेऊन माधवी कडे येतो..

“माधवी हे बघ…शहरात एका कंपनीत vacancy आहे..खूप चांगली पोस्ट आहे आणि पगारही चांगला आहे..जातेस का interview ला?”

“हो हो…खरंच जा…घरातले खजूर तरी संपणार नाहीत…” दुर्गाबाई सांगतात…

“खजूर??”

“काही नाही…कधी आहे interview?”

“उद्याच…”

माधवी तयार होते अन interview ला जाते…

बाहेर अनेक candidates बसलेले असतात, प्रत्येकजण टेन्शन मध्ये असतो…

एकेकाला आत बोलवतात..

“May I come in sir?”

“Yes come in..”

“तर मिस्टर सूचित…काय अनुभव आहे तुम्हाला?”

“सर माझं ms-cit झालेलं आहे. अजून 1 कॉम्प्युटर कोर्स झाला आहे. 2 वर्ष एका खाजगी कंपनीत काम केलं..”

“मग ती नोकरी सोडून इथे का आलाय?”

“मला ग्रोथ हवी होती सर, या नावाजलेल्या कंपनीत मला माझं कौशल्य apply करायला आवडेल..”

(सत्य असं होतं की आधीच्या कंपनीत बॉस सोबत भांडण झालेलं आणि याने तडकाफडकी नोकरी सोडलेली)

“बरं… आम्ही तुम्हाला का म्हणून नोकरीवर घ्यावं??”

Interview घेणारा चांगलाच खमका होता…

“सर माझ्यात ते सर्व स्किल आहे जे या कंपनीला वर नेऊ शकेल….” 

स्वतःचं कौतुक आणि बढाया मारायला सूचित ने सुरवात केली..

“ठीक आहे या तुम्ही…next??”

पुढचा नंबर माधवी चा असतो…

माधवी सरळ दार उघडून आत येते अन बसते…

“दार knock करून यायचं असतं मिस माधवी…एटिकेट्स माहीत नाही का??”

“कसं आहे सर…एक तर तुम्ही आम्हाला इथे बोलावलं म्हणजे आत घेणारच आणि बसवणारच…may i come in म्हटल्यावर आजतागायत कुणी “no” असं म्हटलेलं नाही…आणि उगाच त्यात वेळ घालवून कंपनीच्या productivity वर फरक का पाडून घ्यायचा?”

Interview घेणाऱ्याला त्याच्या वरचढ मुलगी भेटली होती…

Interview चालू होता, माधवी interview घेणाऱ्याला सळो की पळो करून सोडत होती…

“अनुभव?”

“इथे काम केल्याशिवाय येणार नाही…”

“टक्केवारी?”

“माझ्या resume मध्ये आहे..”

“का घ्यावं आम्ही तुम्हाला?”

“पटत असेल ते घ्या, नाहीतर दुसरीकडे बघेन…”

“ह्ये???”

“हो…सरळ साधं गणित आहे…तुम्हाला काय वाटतं? मी नाक घासावं नोकरीसाठी??”

“तसं नाही..पण..”

“नाही तसं असेल तर सांगा..काय ए, माझ्याकडे resume ची एकच कॉपी आहे…परत दुसरी प्रिंट काढायची म्हणजे कंटाळा येतो हो..तुम्ही असही नोकरी देणार नसाल ते तो resume dustbin मध्ये जाईल… कशाला ना उगाच…”

“तुम्हाला अजून काय काय येतं?”

“मला अवघड गोष्टी सोप्या करायला आवडतात…कुठल्याही गोष्टीचा सरळ विचार करायला आवडतो…एखाद्या गोष्टीची आपणच गुंतागुंत करून आपणच डोकं आपटत बसायचं…मला नाही जमत…”

या उत्तराला मात्र interviewer खुश होतो…ही मुलगी सर्वांहून वेगळी आहे, आणि कंपनीतील अवघड गोष्टी सोप्या करणं हिच्याहून जास्त कुणाला जमेल..

“Great…I am impressed…”

“मग सॅलरी किती देणार??”

“काय?”

“हे बघा…जास्त ताणू नका…” माधवी उठून उभी राहते..

“एकच उत्तर द्या…yes or no…”

“कसं आहे की…”

“Yes or no?”

“आम्हाला सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो..”

“आणा तो resume…2 वाजता दुसरा inyerview आहे..”

“अहो…थांबा थांबा…yes yes…”

“पगार?”

“20 हजार?”

“कधीपासून येऊ?”

“10 तारखेपासून..”

“ठीक आहे…धन्यवाद… “

माधवी बाहेर जाते, बाकीच्या कॅन्डीडेट्स ला..

“माझं सिलेक्शन झालं आहे, तुम्ही दुसरीकडे try करा..”

माधवी घरी येते…पेढे घेऊन…

“मला नोकरी मिळाली..”

“इतक्या लवकर ठरलं पण?”

“माधवी आहे ती…” तुषार म्हणाला…

“अभिनंदन माधवी..”

सासूबाई अन तुषार दोघेही तिचं अभिनंदन करतात…

जॉईन व्हायला अजून काही दिवस बाकी असतात…

सासूबाई सकाळी घरातलं आवरून शाळेवर जातात…तुषारही कामाला निघून जातो..माधवी घरी एकटीच असते….तिला कंटाळा येतो…काय करावं हा प्रश्न असतो…

टेरेस वर जाऊन मस्त गाणी ऐकावी असा ती विचार करते, त्या गडबडीत खालचा दरवाजा उघडाच राहिलाय हे तिच्या लक्षात येत नाही…

याच संधीचा फायदा घेत 2 चोर आत शिरतात…माधवी च्या कानात हॅडफोन असतात..तिला खालची गडबड ऐकू येत नाही…

चोर कपाट फोडतात, सर्व दागदागिने,पैसे आपल्या थैलीत भरतात अन निघणार इतक्यात…

“काय मग…काय काय हाती लागलं?”

माधवी ला असं अचानक पाहून ती घाबतरतात..

पळायला मार्ग शोधतात पण माधवी च्या वाट अडवते..

“हे बघा, मी काही तुम्हाला पोलिसात देत नाहीए, ना सोनं परत मागतेय… मला फक्त एवढंच सांगा की ही बुद्धी सुचते कशी तुम्हाला?”

“म्हणजे?”

“म्हणजे इतर लोकं कमवतात, पगार मिळवतात, तुम्ही हे आयतं का मिळवायचा प्रयत्न करतात?”

“आम्हाला…काम मिळत नाही..”

“का नाही मिळत?”

“कारण..आम्ही शिकलेले नाही..”

“का शिकले नाही?”

“पैसे नव्हते..”

“का नव्हते?”

“कारण आई वडील शिकलेले नव्हते..”

“ते का शिकले नव्हते?”

“पैसे नव्हते..”.

“म्हणजे हे चक्र सुरूच राहणार… पैसा नाही म्हणून शिक्षण नाही, शिक्षण नाही म्हणून पैसा नाही…कुठवर चालेल हे? माणूस चोरी मुद्दाम करत नाही, त्याच्या मानसिकतेत खोलवर कुठेतरी ही सल असते, न्यूनगंड त्याचा मनाला सलत असतो…पैसा मिळवायचं साध्य दिसतं पण साधन चुकीचं वापरता..”

जवळपास अर्धा तास माधवी चोरांना भाषण देते, जड पिशवी हातात घेऊन चोरही आता थकून जातात…

“ताई…हे घ्या तुमचं सोनं… हे माझ्याकडचंही घ्या..पण प्लिज आता नवीन काही सांगू नका, आणि आम्हाला जाऊ द्या…”

माधवी ती पिशवी हातात घेते, स्वतःच्या हातातली अंगठी काढून चोरांना देते अन मुलांचं शिक्षण करायला लावते…

संध्याकाळी तुषार आणि सासूबाईं घरी येतात…

“काय मग, काय केलं आज? कुणी आलं होतं का?”

“चोर.”

तुषार अन सासूबाई हातातलं सगळं सोडून माधवी जवळ येतात..

“काय बोलतेयस?”

“चोर आले होते…”

“अरे देवा..काय काय चोरलं त्यांनी? आणि त्यांनी चोरी करेपर्यंत तू काय करत होतीस? अरे देवा…हिला उगाच घरी ठेवलं…बाहेर असती तर असं झालं नसतं..”

“सासूबाई…chill…. हे घ्या..”

“हे काय? सोन्याची चेन?? कुणाची आहे?”

“चोराची..”

“त्याने घर लुटलं की तू त्याला लुटलंस??”

2 thoughts on “मिस परफेक्ट (भाग 4)”

Leave a Comment