मिस परफेक्ट (भाग 1)

 “माधवी…अगं ए माधवी थांब…”

पार्किंग मधून गाडी काढत निघालेल्या माधवी ला तिच्या मैत्रिणीने, शुभरा ने हाक दिली तशी ती थांबली..

“काय गं..”

“या तुझ्या फाईल्स…तू लॅब मधेच विसरली होतील…उद्या सबमिशन आहे…”

“Ok thank you..”

इतके थंड उद्गार काढून माधवी फाईल्स बॅग मध्ये ठेऊ लागली..

“अगं ए..thank you राहू दे…फाईल्स मला दिसल्या नसत्या तर काय केलं असतं?”

“काय केलं असतं?”

“तुला विचारतेय..”

“काहीच नाही…”

“सबमिशन झालं नसतं तर मार्क्स नसते मिळाले..”

“मग?”

“मग? मग रिझल्ट कमी लागला असता ना..”

“मग?”

“ए बाई…जा तू…इतकी कशी बिनधास्त गं तू? काहीच कसं वाटत नाही?”

माधवी हसून निघून जाते…

“इतकी कशी बिनधास्त आहे ही?एखाद्या मुलीने आपण कितो वेंधळे म्हणून मनस्ताप केला असता…”

माधवी..अत्यंत थंड, बिनधास्त मुलगी. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला…टेन्शन काय असतं हे तिला माहीत नाही…बिनधास्त जगायचं, डोक्याला ताप करून घ्यायचा नाही हेच तिचं तत्व… पण एवढं असून तिला आजवर काहीही नुकसान झालं नाही..अभ्यासात अव्वल बर का..आणि जे काम मुली रडत खडत जीव काढून 2 दिवसात करत तेच काम ती एका दिवसात अगदी रमत गमत करे…

याच शहरात एका शाळेत दुर्गा बिराजदार नामक एक शिक्षिका होत्या…नावाप्रमाणेच रौद्र रूप…घरात सर्वजण यांच्या आज्ञेखाली आणि शाळेत? दुर्गा बाई समोर दिसल्या की पोरं नुसती चळचळ कापत…. दुर्गा बाईंचा तास वेळापत्रकात असला की पोरांना घाम फुटे….

दुर्गा मॅडम म्हणजे माधवी ची मैत्रीण शुभराची आई…दुर्गा बाईंच्या कडक स्वभावामुळे शुभरा ला सर्व काम अगदी काटेकोरपणे करण्याची सवय लागली होती…

दुर्गा बाई म्हणजे आपलं सर्व काम चोख झालं पाहिजे या मताच्या, त्यासाठी कितीही आदळआपट करावी लागली, कितीही टेन्शन घ्यावं लागलं तरी चालेल…प्रचंड जिद्दी स्वभाव…

माधवी आणि दुर्गा बाई…दोघीही जिद्दी, यशस्वी आणि चलाख…पण एक कमालीची मवाळ, तर एक कमालीची जहाल…

मग जेव्हा ह्या दोन टोकाच्या व्यक्ती एकाच घरात सासू सुना म्हणून येतात तेव्हा काय रसायन तयार होतं, घरात कशी धमाल होते, कश्या हाणामाऱ्या होतात 😂 हे बघाच पुढील भागात…

भाग 2

https://www.irablogging.in/2021/05/2_22.html?m=1

भाग 3

https://www.irablogging.in/2021/05/3_22.html?m=1

भाग 4

https://www.irablogging.in/2021/05/4_22.html?m=1

भाग 5

https://www.irablogging.in/2020/03/5.html

भाग 6

https://www.irablogging.in/2021/05/6_22.html

भाग 7

https://www.irablogging.in/2021/05/7_22.html?m=1

भाग 8

https://www.irablogging.in/2020/03/8.html

भाग 9 अंतिम

https://www.irablogging.in/2020/03/9.html

1 thought on “मिस परफेक्ट (भाग 1)”

Leave a Comment