दहशतवादी चिडतात पण तेवढेच घाबरतात, विमानात ते फक्त 5 आणि इतर 60 प्रवाशी. संपदा बाहेर येते, या पाचही लोकांना रांगेत एक खुर्चीवर बसवते आणि हाताची घडी घालत नजर रोखून प्रत्येकाकडे बघते…
“ये धोखा है…”
“अबे चूप…”
संपदा त्याच्या एक कानशिलात लावते…
आशा चव्हाण पुढे येते…
“माझ्याच देशात राहून देशाचीच गद्दारी करेन असं वाटलं तरी कसं तुम्हाला???”
“मग…मागच्या वेळी तुम्ही आम्हाला भारतात येण्यासाठी परवानगी काढून दिलीत… त्याचं काय?”
“विश्वास….विश्वास संपादन झाला ना तुमचा…नाहीतर असे आयते सापडले असते? विमानात बॅग चेक करतानाच मी सूचना दिल्या होत्या की बॅगेतून बंदुका येतील त्या सगळ्या गोळ्या रिकाम्या करा…”
नीरज फक्त बघत असतो…त्याला आता थोडं फार समजू लागतं..
“ओ नीरज भाई….कहा तक पिच्छा करोगे भाय हमारा??” राशीद नीरज ला विचारतो…
नीरज दचकतो,
“अं??? काय? मी नाही…”
“चल इकडे ये….अरे सगळं माहितीये आम्हाला..आमच्या चौघातलं connection काय आहे हे बघायलाच आमचा पिच्छा करत होतास ना??”
“तुम्हाला कसं कळलं?”
“ते सोड…ए लँडिंग ला अजून किती वेळ आहे रे??”
“अजून 2 तास..”
“चल मग नीरज…तुला आता आमचं connection सांगूनच टाकतो…”
नीरज ला तेच ऐकायचं होतं.आणि प्रवाशांना पण काहीतरी मनोरंजन हवंच होतं…
“सारिका, संपदा, आशा आणि मी राशीद… एकाच शाळेत.. अगदी पहिलीपासून…. आमचे सावंत गुरुजी…आमचे सर्वात लाडके… पुण्याला असताना गुरुजींचं कुटुंब एका हल्ल्यात मारलं गेलं, आणि राशीद चे वडील त्यातच शहीद झाले…हा धक्का आम्ही दोघेही पचवू शकले नाही. एक दिवस संपदा, आशा आणि सारिका संध्याकाळी सरांना भेटायला घरी आले…मीही सरांच्याच घरी होतो….आम्हा दोघांचे हाल या तिघींना पहावले गेले नाही…संपदा म्हणाली,
सर…ज्यांनी तुमच्या आयुष्याची राखरांगोळी केली त्यांना आम्ही सोडणार नाही…
काय करणार तुम्ही??
माहीत नाही, पण त्यांना धडा नक्कीच शिकवणार….
तुम्ही फक्त सांगा सर, काय करायचं….तुम्ही आजवर आम्हाला इतकं दिलंय, आता गुरुदक्षिणा म्हणून आमचं कर्तव्य, त्या दहशतवादयांना ठार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही…
इतक्यात लाईट गेली…सरांनी एक मेणबत्ती पेटवली, त्या प्रकाशात सर्वांचे चेहरे फक्त दिसू लागले होते…आकाशात वादळ घोंगवू लागलेलं… त्या चार भिंतीत एक मोठा संकल्प होणार होता….
“पण मग तुम्ही असे वेगवेगळे… वेगवेगळ्या क्षेत्रात??”
“ते आमचं मिशन होतं… मिशन इंडिया..”
“मिशन इंडिया??”
“होय…भारतात दहशतवादयांच्या किडीपासून वाचवायचं…. गुरुजींनी आम्हाला समजावलं, की देशभक्ती केवळ सैन्यात जाऊन किंवा अधिकारी होऊन बजावता येते असं नाही…”
“मग, इतक्या टोकाच्या क्षेत्रात काम करून कसं शक्य होणार होतं?”
“मकबूल खान….”
राशीद ने नाव घेताच मकबूल ने वर पाहिलं..
“पुण्याच्या हल्ल्यात तुझाच हात होता ना? आम्ही तेव्हापासून तुझा पाठपुरावा करतोय…”
“काय??”
“होय..गुरुजींनी टास्क दिलं…सारिका ला बिझनेस वूमन बनायला सांगितलं,जेणेकरून मिशन साठी पैसा उभा करता येणार होता…मी रायफल शूटर बनलो, देशोदेशी मला जाणं सोपं झालं..आशा ला राजकारणात जायला लावलं…राजकारणात जाऊन अंडरवर्ल्ड शी संबंध जोडून हळूहळू मकबूल पर्यन्त पोहचायचा मार्ग मिळणार होता…आणि एक असा माणूस हवा होता की त्यावर कुणालाही शंका येणार नाही….ती आमची सोज्वळ सुंदर संपदा…”
“परभणीत त्या पासपोर्ट साठी काय झटापट झालेली?”
“परभणीत या चौघांचा नकली पासपोर्ट आम्हीच बनवून देणार होतो, आम्हाला वाटलेलं की मकबूल स्वतः पासपोर्ट घ्यायला येईल, गुरुजी वाट बघत होते वेशिवरच…. पण दुसरंच कुणीतरी आलं…त्यात पोलिसांचा छापा पडला…आम्ही त्यातून वाचलो खरं….पण काहीही करून आम्हाला तो पासपोर्ट मकबूल ला द्यायचा होता…मग …”
“एका म्हाताऱ्या आजोबांकडून तो पोचवला… बरोबर??”
नीरजने वाक्य पूर्ण केलं आणि त्याला अभिमान वाटला स्वतःचा….त्याला वाटलं राशीद विचारेल की तुला कसं माहीत…
“By the way त्यांना आम्हीच कळवलं होतं की एक पत्रकार मदतीसाठी जवळपास दिसेल त्याला आसरा द्या….आम्ही तुझाही मागोवा घेत होतो बरं का…”
नीरज वरमला…
“तर मग पुढे, मकबूल आणि त्याच्या साथीदारांनी प्लेन हायजॅक चा प्लॅन केला ..आशा चव्हाण चे संबंध दहशतवादी संघटनेपर्यन्त पोचले होते आणि त्यांचा विश्वास तिने संपादन केला होता…मकबूल ने विमानात बंदुका नेण्यासाठी आशा चव्हान कडे मदत मागितली, आशा ने तिचि पॉवर वापरून बंदुका आत आणल्या खरं, पण गोळ्या मात्र काढून घेतल्या…”
ही सगळी कहाणी सर्व प्रवासी कान देऊन ऐकत होते..
“आज आमच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस आहे….आज आमचं मिशन इंडिया पूर्ण झालं…”
“जोवर मकबूल आणि साथीदार मारले जात नाही, तोवर नाही….”
“प्लेन लँडिंग नंतर पोलिसांकडे यांना देऊया…”
“राशीद…. नाही. यांना इथेच शिक्षा मिळायला हवी…”
“कायदा हातात घ्यायचा नाही…”
“कायदा हातात घेतला नाही तर हे कदाचित सहीसलामत सुटतील…फाशीचा निर्णय होईपर्यंत कित्येक वर्षे जातील…”
सर्वजण विचारात पडतात…
मकबूल चिडतो,
“आमचं काय करायचं हे ठरवणारे तुम्ही कोण? आम्ही कितीतरी भारतीयांना हल्ल्यात मारलंय… तुम्हाला एका क्षणात ढगात पाठवू शकतो…”
तो असं म्हटल्यावर प्रवाशी,एअर होस्टेस आणि हे चौघे एकटक त्याच्याकडे बघतात…हळूच एअर होस्टेस पुढे येते….
“सर दरवाजा उघडा केलाय…”
राशीद या पाचही दहशतवादयांकडे पाहतो…
“आम्ही already ढगात आहोत, पण तुम्हाला मात्र जमिनीवर सुखरूप पाठवतो…”
त्या पाचही लोकांना एकेक करून खाली ढकलून देण्यात येतं…. आणि विमानात एकच जल्लोष होतो…
इतक्यात नीरज ला बॉस चा मेसेज येतो….
“नीरज ज्या प्लेन चं हायजॅक झालंय त्यात तू आहेस ऐकलं… सगळं रिपोर्टिंग कर…लगेच..जगलास तर प्रमोशन देईन…”
“कसलं हायजॅक सर? एकाने एप्रिलफुल केलं आम्हाला विमानात….”
समाप्त
Khuppp chhan hoti ktha short film sathi uttam aahe…..
खरोखरच खुप छान होती कथा
आणि खरंच यावर चित्रपट होऊ शकतो बर् का