“प्लेन हायजॅक… प्लेन हायजॅक…”
पायलट आकांताने ओरडला आणि कंट्रोल रूम मध्ये त्याचा सिग्नल अचानक तुटला..भारत सरकारला माहिती देण्यात आली..सर्वांना 1999 च्या प्लेन हायजॅक आठवण झाली, 155 प्रवाशांना ओलीस धरण्यात आलं होतं. विमानात 5 अतिरेक्यांनी सर्वांवर बंदुका रोखून धरल्या होत्या…प्रवाशी घाबरून गेले, काहींना bp चा त्रास, त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, काहीजण रडायला लागले, काही क्षणापूर्वी नॉर्मल वातावरण असताना आता अचानक मृत्यू समोर दिसू लागला….
पत्रकार नीरजच्या मनात मात्र भीती नव्हती, त्याला मृत्यूचं भय नव्हतं…शिखा, सारिका, विशाल आणि राशीद चं गूढ उकलायला तो इथवर आलेला…ही चौघे सुद्धा याच विमानात होती….
विमानात आता काय होतं हे समजेलचं पुढे…त्याआधी या पाचही लोकांची कहाणी ऐकूया…
****फ्लॅशबॅक…***
“मिस्टर नीरज…तुम्ही पत्रकारिता सोडली तरी चालेल… एकही बातमी तुम्ही आणू शकत नाही…त्या कासेवाडीमध्ये इतकी मोठी घटना घडली त्याची खबरही तुम्हाला देता आली नाही? अखेर दुसऱ्या पत्रकाराने आम्हाला ती माहिती दिली..काय करत होता तुम्ही तिथे?”
“सर…तिथे एका मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला…पण वेळीच लोकांनी पाहिलं आणि अनर्थ टळला…आता याची खबर देणं म्हणजे त्या मुलीच्या कुटुंबाची आणि तिची इज्जत चव्हाट्यावर आणल्यासारखं होईल…”
“आपलं काम ते नाही, मला फक्त सणसणीत बातमी हवी…”
“म्हणून काय आपण सामाजिक भान ठेवायचं नाही??”
“तुम्हाला आता एक शेवटची संधी देतो… या बातम्या आणणं तुम्हाला जमणार नाही असं दिसतं… तुम्हाला आता दुसरं काम…”
“चालेल सर….सांगा काय काम आहे…”
“आपल्या महाराष्ट्रातले दिग्गज लोकं, त्यांच्याशी संपर्क करायचा आणि त्यांच्या मुलाखती घ्यायच्या…ही धरा लिस्ट…ही लोकं मुलाखती देत नाहीत…त्यांचा मागोवा घ्यायचा आणि मुलाखत आणायचीच…”
“पण सर त्यांना ईच्छा नसेल तर मग..”
“पुन्हा तेच?? बॉस तुम्ही आहात का मी? नसेल जमणार तर चालते व्हा इथून..”
नीरज विचार करतो…मसाला लावून बातम्या आणण्यापेक्षा हे एक बरं आहे…
“सर ठीक आहे….मी बघतो मुलाखती चं…”
नीरज ला आता नवीन काम मिळतं, तो सरांनी दिलेली लिस्ट बघतो…पहिलं नाव…”सारिका मिराजदार… टॉप बिझनेसवूमन…”
सारिका मॅडम शी सम्पर्क करणं महाकठीण…यशाच्या शिखरावर असून सुद्धा मॅडम मीडिया पासून दूर रहात असत…वयाच्या तिसाव्या वर्षीच सारिकाने उत्तुंग यश मिळवलं होतं…पुरुषी मक्तेदारी असलेल्या बिल्डर व्यवसायात तिने एकच झेप घेतली होती…महत्वाचं म्हणजे घरची कुठलीही मोठी जमीन नसताना आणि पैशाची अडचण असताना सारिका ने हे सगळं कसं घडवून आणलं यावरून तिच्या कष्टाची जाणीव होते…
सारिका झगमगाटी पासून कायम दूर….तिचा फोटो गुगल केल्यावरच एखादं दुसरा सापडत असे.
अश्या व्यक्तिमत्वाची मुलाखत घ्यायला नीरज ला जायचं होतं . त्याने सारिका च्या ऑफिस मध्ये फोन लावला…
“हॅलो, मी जर्नलिस्ट नीरज, मला सारिका मॅडम ची मुलाखत घ्यायची आहे….”
“सॉरी, मॅडम कुठलीही मुलाखत देत नाहीत..”
“फक्त 15 मिनिट… बस…”
“सॉरी सर, आम्हाला strict वॉर्निंग आहे…”
“सारिका मॅडम ला कनेक्ट करून द्या फोन, मला बोलायचं आहे त्यांच्याशी…”
“सारिका मॅडम इथे नाहीत, बिल्डर्स असोसिएशन च्या मिटिंग ला गेल्या आहेत…”
नीरज ला एवढं तर समजलं की मॅडम कुठे भेटतील…तो तडक माहिती घेऊन पार्टी च्या ठिकाणी पोचतो….
तो तिथे गेला तर खरं, पण सारिका मॅडम नक्की कोण ? याने त्यांना पाहिलेलंही नव्हतं, कुणाला तरी विचारून माहिती घेऊ असं ठरवून तो योग्य वेळेची वाट बघतो…
शेजारीच काही जोडप्यांचा ताफा येतो, त्यातला एकजण म्हणतो,
“आपण सगळे माणसं मिळून एक ग्रुप फोटो काढू…”
सगळी माणसं आपापल्या बायकांना एकमेकांसोबत सोडून फोटो साठी निघून जातात….सर्व मोठमोठ्या बिल्डर्स च्या बायका आता एका ठिकाणी जमतात, त्यांच्या गप्पा सुरु होतात..
“काय बाई आजकाल चांगली कैरीच मिळत नाही, पूर्वी कशी लोणचं करायचो आता मेलं चवच बसत नाही….तुमचं वाळवण झालं का हो? यावेळी ना माझा पापडखार कमी पडला….घोळच झाला बघा…”
ती एक स्त्री खुप बडबड करत होती, त्या घोळक्यात एक मॉडर्न स्त्री एका बाजूला एकटी उभी होती..
“यांच्या काय बायकी गप्पा चालल्या आहेत” म्हणून ती मुद्दाम बाजूला उभी होती…
त्या बडबड करणाऱ्या स्त्री ने तिला एकटं पाहिलं आणि तिच्याजवळ गेली…..
“नमस्कार, आपलं नाव?”
“मेघना..”
मेघना ने उत्तर देता देता तिच्याकडे एकदम तुसड्या नजरेने पाहिलं….टिपिकल साडी, टिपिकल hairstyle… बोलण्यात गावठिपणा.. आणि गप्पा कसल्या? पापड अन लोणची….
“नमस्कार… मी…”
“हे बघा, मी एकदम स्पष्ट बोलते, मला या बायकी गप्पात अजिबात इंटरेस्ट नाही.. “
“ठिके, मग तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे त्यावर बोलूया..”
मेघना त्या स्त्रीकडे पाहून तुच्छ हसते,
“ठिके बोलूया ना, पण तुम्हाला समजेल?”
“बोलून तर पहा…”
“बरं…. let me clear…. मला बायकी गप्पात अजिबात आवड नाही…. मला काहीतरी…out of the box करायला आवडतं… I mean…. काहीतरी भन्नाट… असं काहीतरी कर्तृत्व की जे पुरुषांनाही जमलेलं नाही….I want to achieve something…I wants to be a successful entrepreneur…”
ती स्त्री हसून तिच्याकडे बघते आणि म्हणते…
“मग एक काम करा की, ज्वारीचे बिबडे बनवा…एकदम वेगळं आणि एकदम झक्कास, पुरुषांना जमत नाही ते…”
“Wtf…. उगाच बोलले मी…मला माहित होतं तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही….”
“सॉरी सॉरी…हे बघा मी अडाणी बाई, मला जास्त काय कळणार….”
“See सारिका मिराजदार…आयुष्यात एकदा तरी भेटायचं आहे त्यांना…she is my idol… त्यांच्यासारखं बनायचं आहे….”
“भेटा की मग..”
“तोच तर प्रॉब्लेम आहे, त्या आपली identity दाखवत नाही, even त्यांचा फोटोही आजवर कुठेही मिळाला नाही…जाऊद्या, सॉरी to say पण मी इथे थांबू शकत नाही..”
असं म्हणत मेघना तिथून निघायला लागते आणि मनाशीच पुटपुटते…”useless lady…”
इतक्यात ती स्त्री तिला थांबवते…
“हॅलो मेघना….myself Mrs. सारिका मिराजदार…nice to meet you…”
मेघना चे पाय थबकतात…
“What? I mean…how?? No way…. You are kidding…”
“Miss Meghana, being a successful entrepreneur must need to behave as per the surroundings, here is the group of housewives, and I should talk to them as per their interest….no point in discussing the area which is not of their interest….”
मेघना चा अहंकार क्षणात गळून पडतो…
पत्रकार नीरज ते सगळं बघत असतो आणि finally सारिका मॅडम ची ओळख पटली म्हणून तो खुश होतो…
आता तो संधी शोधत असतो, केव्हा एकदा मॅडम कडे जातो आणि मुलाखती साठी विनंती करतो…
क्रमशः
Mast..
खूप खूप खूप छान 😊👌👌
अप्रतिम उत्सुकता वाढवणारी कथा 👌👌