मित्र मैत्रिण-2

बायको चांगलं खाऊ पिऊ घालायची, सगळं करायची,

पण तो ऑफिसमध्ये अगदी रडून आलेला असायचा,

तिचा हसरा चेहरा बघून त्याला काहीही सांगावंसं वाटेना..

अश्यातच इंटरनेट वर एक ऑनलाइन पोर्टल सुरू झालं होतं,

अल्पावधीतच लोकप्रिय होत होतं,

त्यात आपलं नाव समोर न आणता अनामिक राहून आपली व्यथा मांडायची सोय होती,

त्यावर अनामिक लोकं सहानुभूती दाखवायचे, सल्ला द्यायचे…

त्याने त्या पोर्टलचा सहारा घेतला,

थोडसं घाबरतच पहिली पोस्ट टाकली,

“आयुष्यातला रसच निघून गेला तर काय करावं?”

त्यावर अनेका समदुखी लोकांनी प्रतिक्रिया दिली,

काहींनी सल्ले दिले,

त्याला जरा हलकं वाटू लागलं,

मोकळं व्हायचा एक मार्ग मिळाला होता,

तो रोज घरी आला की मनातलं सगळं तिथे पोस्ट करे,

त्याला त्याच्यासारखीच दुःखं असलेली माणसं भेटत होती,

त्यात एकाची प्रतिक्रिया त्याला कायम आवडायची,

सगळेच अनामिक नावाने दिसत, त्यामुळे कोण कोणता हे ओळखणं कठीण असलं तरी त्या व्यक्तीची कमेंट डोळ्यात भरायची,

त्या व्यक्तीची लिहिण्याची एक वेगळीच लकब होती,

ती नजरेत भरायची,

पोर्टल ने नुकतीच एक नवीन सुविधा दिली,

अनामिक व्यक्तीशी पर्सनल chat करू शकणार होते,

याला राहवलं नाही,

याने त्या व्यक्तीशी संपर्क साधला,

तुम्ही मन हलकं करतात म्हणून आभार मानले,

त्या व्यक्तीनेही आपली व्यथा मांडली,

त्या व्यक्तीच्या आयुष्यात सगळं काही होतं, पण सुख नव्हतं, ज्याची अपेक्षा होती, ते साध्य होत नव्हतं…

तो व्यक्तीही मोकळा होऊ लागला,

दोघांचा संवाद वाढत होता,

समोरचा स्त्री आहे की पुरुष ओळखता येत नव्हतं,

दोघांचा संवाद इतका वाढला की तो घरी आल्यावरही सगळं सोडून बोलत बसे,

बायकोही काही बोलत नसायची,

अखेर दोघांना फक्त ऑनलाइन बोलून कंटाळा आलेला,

प्रत्यक्ष भेटुयात असं ठरलं,

दोघांनीही नाव सांगितलं नव्हतं,

दोघांनीही ठरवलं की एक सरप्राईज म्हणून दोघेही समोर येऊ,

एक मित्र म्हणून किंवा मैत्रीण म्हणून,

****

 भाग 3

मित्र मैत्रीण-3

3 thoughts on “मित्र मैत्रिण-2”

Leave a Comment