माहेर-3

 आईला आवाज देई, वडील तिच्या हातातील पिशवी घ्यायला पुढे यायचे..भाऊच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसायचा..

आजीने घराकडे पाहिलं आणि ती भानावर आली,

भूतकाळातून बाहेर आली,

घराला लागलेलं टाळं आणि जीर्ण झालेलं घर तिला बघवत नव्हतं,

सर्वजण सोडून गेलेत, तिच्या लक्षात आलं तेव्हा हृदयात कालवाकालव झाली..

वाड्यातले भाऊबंद सुद्धा कामानिमित्त दुसरीकडे स्थायिक झाले होते,

कोपऱ्यावरची टपरी, वाण्याचं दुकान, झाडाच्या पारावर असलेला चांभार…शोधूनही सापडत नव्हते..

तिचं माहेर संपलं होतं,

आणि माहेरा सोबतच हृदयातील एक हळवा कप्पाही..

आजीच्या वयानुसार मेंदूतल्या पेशी काळ विसरल्या होत्या,

वास्तव आणि भूतकाळ यांचा मेळ बसवण्यात आजीचा बराच वेळ गेला.

घरचेही आजीला तिचा वेळ घेऊ देत होते,

सुनेलाही आपल्या वृद्ध सासूच्या मनात काय चलबिचल आहे हे समजत होतं..

काही क्षण सर्वजण भावविभोर झाले,

नंतर आजीच स्वतःहून सावरली,

चला चला, घरी जायला उशीर होईल..

एकीकडे माहेरचं सुख आणि दुसरीकडे सांसारिक कर्तव्य आजी अजूनही विसरली नव्हती..

तेवढ्यात मागून एक आवाज आला,

“आत्या…कुठं निघालीस…”

आजीने वळून पाहिलं..

एक शेतकरी माणूस मोठ्या आनंदाने आजीकडे बघून म्हणाला,

आजी पटकन त्याच्या जवळ गेली,

चेहरा ओळखू येत नव्हता,

पण तिच्या माहेरी कुणीतरी आजीला अशी प्रेमळ हाक दिलेली,

आजीने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्याला ओळखण्याचा प्रयत्न करत होती,

“आत्या मी गणपत…ओळखलं का?”

“गणपत”

आजीच्या आठवणी सरसर घुमत गेल्या..

“अरे गणपत…तू, अरे एवढासा होतास.. किती मोठा झालास..”

गणपत म्हणजे आजीच्या चुलत चुलत भावाचा मुलगा..

सर्वजण इतरत्र स्थायिक झालेले, पण गणपत अजूनही तिथे शेती करत होता..

आजीचा आनंद गगनात मावत नव्हता, माहेरचं कुणीतरी भेटलं यात तिला आभाळ गवसल्यासारखं झालं..

गणपतने आग्रहाने त्याच्या घरी नेलं,

तसं तर आजीचा सगळीकडेच आदराने पाहुणचार होई,

पण गणपतकडचा पाहुणचार तिला तिच्या आई वडिलांची अन भावाची आठवण देऊन गेला.

कितीतरी वर्षांनी आजीच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान झळकत होतं..

दूरचा का होईना, तिला माहेराचा स्पर्श मिळाला..अन ती भरून पावली..

****

माहेरचं दूरवरचं माणूस जरी संपर्कात आलं, तरी स्त्री मनात काय तरंग उठतात हे फक्त त्या स्त्रीमनालाच ठाऊक! बरोबर ना?

21 thoughts on “माहेर-3”

 1. सुरेख , खरं आहे. माहेर ते माहेरच. त्याला वयाचा अडसर नाही. 🌹

  Reply
 2. खरंय…शेवटचं वाक्य अगदी खरं आहे.माहेरचं दूरवरचा माणूस जरी संपर्कात आलं तरी मनात के तरंग उठतात ते स्त्री मनालाच ठाऊक असतात

  Reply
 3. खरंच माहेर ते माहेर, वाचूनच रडू आलं.. कोण असेल आता माझ्या माहेरी 😭

  Reply
 4. खूप छान वाटले माहेर ते माहेर असतं जुन्या आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद 🙏🙏

  Reply
 5. खरं आहे माहेर ते माहेरच .वाचत असताना डोळे भरुन आले आपलं माहेर डोळ्यासमोर आलं.

  Reply
 6. खूपच छान आई वडिल आहेत तो पर्यंत माहेरचा आनंद घ्या नंतर फक्त आठवणीच

  Reply
 7. अगदी खरं आईवडील आहेत तोपर्यंत माहेरची ओढ खूप असते नंतर मात्र मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवली जाते.

  Reply
 8. घाल घाल पिंगा वार्ऱ्या माझ्या परसात ,माहेरीच्या सुवासाची कर बरसात ..फारच छान

  Reply
 9. आई वडील आहे तोपर्यंत माहेर जगून घ्या नंतर फक्त आठवणी च असतात

  Reply

Leave a Comment