माहेर-2

अश्यातच माहेरी जायला मिळणं म्हणजे स्वर्गसुख असायचं,

पण कितीतरी वर्षांपासून हे सुख आजीच्या वाट्याला आलं नव्हतं,

आजीचा संसार मोठा होता, सगळी माणसं तिचीच होती, पण माहेर संपलं होतं..

आई, वडील, भाऊ, बहीण..वयानुसार सर्वजण हे जग सोडून गेले होते,

त्यांच्या कुटुंबात आजी तेवढी शिल्लक होती,

नातसुनेच्या माहेरची ओढ बघून आजीच्या डोळ्यात पाणी आलं..

तिथून सर्वजण निघाले,

जाताना आजीला रस्ता परिचित वाटला,

वयानुसार आजीला विस्मरणाचा आजार होता,

पण तो रस्ता विसमरणा पलीकडे होता,

ती थरथरत्या आवाजात गाडी चालवत असलेल्या मुलाला म्हणायची,

अरे नाना, त्या तिकडून एक रस्ता जातो मधे.. तिथून वळव..

तिकडे काय आहे आई? हा रस्ता माहीत नाही आपल्याला, कुठे जातो माहीत नाही..

मी सांगते ना, घे तू..

मुलाला प्रश्न पडला,

आई उगीच काहीतरी बोलतेय की खरंच काही असावं?

चला जाऊनच बघू, फार तर रस्ता चुकेल, पण आईचं समाधान होईल..

आजीने वळणावळणाची वाट दाखवत बरोबर एका गावी आणलं..

नानाला नवल वाटलं,

हे गाव म्हणजे आजीचं माहेर,

आईने जो रस्ता सांगितला तो शॉर्टकट होता आणि बरोबर आजीने आणलं..

पुढचा रस्ता नानाला माहीत होता,

एका पडक्या आणि बंद घरासमोर गाडी उभी केली,

आजी पूर्ण ताकदीनिशी खाली उतरली,

यावेळी कुणाच्याही आधाराची गरज तिला लागली नाही,

गाडीतून उतरल्या उतरल्या आजीने आवाज दिला..

“माये..आले गं बाय मी..अण्णा, पिशवी नाही घेणार का माझी..बापू, बायकोला पुरण टाकायला लाव..”

गाडीतून उतरता उतरता आजी बोलू लागली,

माहेरी गेल्यावर दरवेळी दारात तिची हीच वाक्य असायची,

****

भाग 3

Leave a Comment