मानपान-1

लग्न ठरलेल्या शुभदाच्या घरात वराकडची मंडळी सण घेऊन आलेली,

ते पाहुणे निघाले तेव्हा शुभदा आई आणि इतर नातेवाईकांशी भांडत होती..

शुभदा,

शिकलेली,

नोकरी करणारी,

उच्चशिक्षित आणि आधुनिक..

लग्न तिच्या पसंतीच्या मुलाशी होणार होतं..

घरभर लग्नाची रेलचेल…

पण जसजश्या एकेक रुढीनुसार कार्यक्रम होत होते तसतसं शुभदाचा राग वाढत होता..

मुलाकडची मंडळी म्हणून विशेष मान..

आपण मुलीकडचे म्हणून कायम मान खाली,

जसा काही गुन्हाच केलाय,

मुलाच्या आईला सोनं..

मुलाला सोनं..

मुलाच्या बहिणीला महागड्या साड्या..

नातेवाईक म्हणायचे,

अगं बाई पद्धत असते तशी..

करावंच लागतं..

नाहीतर उद्या तुला सासरी त्रास..

“त्रास सहन करून घ्यायला मी काही लाचार नाही..”

ती म्हणायची,

तिला हे सगळं बिलकुल पटत नव्हतं,

पण आई वडील तिला गप करायचे,

तीही आतल्या आत कुढत शांत राहण्याचा प्रयत्न करायचा..

संक्रांतीचा दिवस होता..

****

भाग 2
https://irablogging.in/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a8-2/

भाग 3
https://irablogging.in/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a8-3/

1 thought on “मानपान-1”

Leave a Comment