मस्ती की पाठशाला (भाग 9)

  

परीक्षा जवळ आलेली असते. विद्या पूर्ण मेहनतीने मुलांचा अभ्यास घेत असते. विद्याची लोकप्रियता इतर स्टाफ च्या डोळ्यात खुपु लागलेली. इतर प्रोफेसर नी आपला syllabus थोडक्यात आटोपून घेतला होता, पण विद्या मात्र मुलांना प्रत्येक chapter खोलात जाऊन शिकवत होती. त्यामुळे तिचा syllabus बराच मागे होता.

एकदा प्रिन्सिपल ने विद्या ला त्यांच्या ऑफिस मध्ये बोलावलं..दिशा सुद्धा नेमकी त्यावेळी ऑफिस मध्ये सरांची सही घेण्यासाठी आलेली असते. .

“मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये आपण लोकप्रिय आहातच… पण अशी तक्रार आलीये की तुमचा syllabus खूप मागे आहे..तुम्ही इतर activities वर जास्त भर देताय..”

“नाही सर…माझं शिकवणंही तितक्याच गतीने सुरू आहे…तक्रार केली तरी कुणी?”

“ते महत्वाचं नाही..यापुढे काळजी घ्या…या तुम्ही..”


विद्या ला धक्का बसतो…हे विद्यार्थ्यांचं काम नक्कीच नाही हे तिला माहीत असतं, मग हे असं करावं तरी कुणी?

दिशा ते सगळं ऐकते…तिलाही धक्का बसतो..कुणी केलं असेल हे?? ती वर्गात सर्वांना ही माहिती देते..

“ए कोण बोललं रे?”

“आम्ही नाही..”

“कुणीच बोललं नाही…मग तक्रार केली कुणी??”

दुसरा तास जोशी सरांचा असतो, आज ते खूप खुश दिसत असतात…

“काय मग, math कुठपर्यंत आलंय??”

“4 unit..”

“फक्त? अरे काय तुम्हीं… मॅम ला काही जमत नाहीये वाटतं… आपला syllabus बघा, मागच्या महिन्यातच पूर्ण झाला..”

“पूर्ण नाही झाला…गुंडाळला तुम्ही…” मुलं कुजबुजतात…

जोशी सर न ऐकल्यासारखं करतात…मुलांना काहीही प्रश्न विचारून टाईमपास करत असतात.

आकाश च्या डोक्यात ट्यूब पेटते… त्याला लक्षात येतं की हे जोशी सरांचं काम आहे… तो पटापट त्यांच्या वर्गाच्या व्हाट्सअप्प ग्रुप वर टाकतो..

“पोरांनो…विद्या मॅम ची तक्रार यांनीच केलीये…”

“मलाही तेच वाटतंय..”

“हे सहन करायचं नाही आपण…विद्या मॅम आपल्यासाठी इतकं सगळं करतात, आणि त्यांच्यावरच असा आरोप?”

“हो ना…चोराच्या उलट्या बोंबा…”

“आता मी सांगतो तसं करा..”

आकाश सर्वांना त्याचा प्लॅन सांगतो..आणि सर्वजण तयार होतात…

शंतनू उठून उभा राहतो,

“सर…विद्या मॅम आम्हाला अजिबात आवडत नाहीत .”

“हो ना सर…आम्हाला शिकवलेलं काहीच कळत नाही…आणि वर काहीही उद्योग करत बसतात..”

जोशी सर खुश होतात..

“खरंच कीं काय?मी तर समजत होतो की…”

“सर तुमच्या पेक्षा चांगले प्रोफेसर आपल्या कॉलेज मध्ये दुसरे कुणिही नाही..”

मुलं सरांना हरभऱ्याच्या झाडावर चढवतात…सर आता अगदी भान हरपून जातात आणि त्यांचं जीभ घसरते…

“तुम्हाला खरं सांगू? ती मॅम कॉलेजात आली तेव्हापासून मला तिच्याबद्दल राग होता…माझ्या सारख्या सिनियर सोबत डोकं लावलं तिने. तिला अनुभव तरी आहे का ? म्हणून मी प्रिन्सिपल कडे तिची तक्रार केली…आता तिला चांगलीच अद्दल घडली असेल…आणि बघा आता, मी असं काही करतो ना काही दिवसातच त्या कॉलेज सोडून जातील…त्यांचं इथे राहणं मुश्किल करून टाकेन मी..”

मुलं आता संतापतात…

ग्रुप वर चर्चा सुरू होते..

“असं आहे तर..या मास्तर ने तक्रार केली..”

“आता यांचं काही खरं नाही. “

“दिशा, तुझ्या जुन्या सिम वरून प्रिन्सिपल सरांना आत्ता काढलेला व्हिडीओ पाठव…आणि सिम फेकून दे…”

“Done..”

“बरं मुलांनो… तुम्हाला अजून काही सांगायचंय??”

“काही नाही सर… God bless you..”

“काय?”

पूर्ण वर्ग एकसुरात म्हणतो…

“God bless you…”

सर बुचकळ्यात पडतात…हे काय आता? ओह…माझ्यासाठी शुभेच्छा व्यक्त करताय…आभार आभार…

जोशी सरांचा तास सम्पतो. अन कॉलेजची सुटतं… सर खुशीत वर्ग सोडून जायला निघतात तोच प्रिन्सिपल सर ओ…त्यांच्या डोळ्यात संताप असतो..

“मिस्टर जोशी..आत्ताच्या आत्ता माझ्या केबिन मध्ये या..”

जोशी सर केबिन मध्ये जातात…पूर्ण वर्ग केबिन बाहेर कान लावून ऐकत असतो…प्रिन्सिपल सरांच्या एकेका वाक्यावर मुलं..

“और ये मारा सिक्सर…”

“बॅट्समन बुरी तरह से घायल…”

मुलांचं हे सगळं विद्या बघते…

“इथे काय करताय सर्वजण??”

सर्व मुलं तिथून पळ काढतात…

विद्या ला आतून आवाज ऐकू येतो आणि तिला समजतं की ही तक्रार जोशी सरांनी केली आहे…आणि मुलांनी नक्कीच काहीतरी कांड केले असणार…

क्रमशः


1 thought on “मस्ती की पाठशाला (भाग 9)”

Leave a Comment