मस्ती की पाठशाला – भाग 4

 विद्या सर्वांना पार्किंग मध्ये घेऊन जाते. मुलांच्या हातात आपापल्या गाडीची चावी असते..

“सर्वांनी आपापल्या गाड्या काढा आणि ग्राउंड वर चला..”

सर्वजण ग्राउंड वर पोचतात…

“आता ऐका, गेम असा आहे की तुम्हाला समोर ते झाड दिसतंय ना, तिथे एक मार्किंग केलं आहे. तुम्हाला तुमची गाडी चालवत तिथपर्यंत न्यायची आहे..”

“बस इतकंच..”

“नाही..त्याला काही नियम आहेत..तुम्हाला एक विशिष्ट टाइम दिला जाईल…बरोबर त्याच वेळेत तिथे पोहोचायचं.. आणि गाडी इथून चालू करून थोडी पुढे न्यायची, पुढे शंतनू उभा असेल त्याच्यापासून पुढे त्या झाडापर्यंत जाईस्तोवर स्पीड एकदम सारखा ठेवायचा…लक्ष ठेवण्यासाठी तुमच्या मागे एक मुलगा डबल सीट बसेल…”

“इंटरेस्टिंग… ट्राय करूया…”

मुलं एकदम जोमाने तयार झाली…

“दिशा…चल तू आधी…प्रज्ञा ला मागे बसव..प्रज्ञा, शंतनू पर्यन्त गाडी गेली की तिथून पुढे स्पीड सारखा आहे की नाही ते बघ, आणि हे घे टाइमर…बरोबर 70 सेकंदात पोहोचायचं….इथून तिथपर्यंत अंतर 0.5 km आहे…”

दिशा उत्साहाने प्रज्ञा ला सोबत घेऊन जाते..गाडी सुरू करते..

“ए प्रज्ञा, मला सांग बर का किती टाइम झाला ते..”

“हो तू चल..”

गाडी सुरू होते, दिशा स्पीड शंतनू उभा असतो तिथून पुढे सारखा ठेवते…

“अगं आत्ताशी 40 सेकंद झालेत…”

“अरे यार..आपण जवळ पोचलो..स्पीड कमी करू का?”

“नाही…नियमात नाही ते…घे…पोचलो पण आपण..”

“शीट यार…”

“चला पूढे कोण जाणार??”

“मॅडम मी…मी…”

“बरं आकाश तू चल…”

आकाश एकदा क्रांती कडे बघतो, हसून गाडीवर बसतो..क्रांती लाजते..

आकाश च्या मागे नकुल बसतो…

“चल आकाश…सुरू कर..”

आकाश क्रांती कडे बघतो, आणि एखाद्या हिरो सारखा भरधाव गाडी घेतो..

इतकी भरधाव की नकुलला एकदम झटका बसतो आणि तो मागच्या मागे पडतो…तिथले सर्व मुलं पोट धरून हसायला लागतात…

“ए हारा*खोर…काय पोरगं आहे…नियम ऐकले नाही का याने..” शिवी देऊन नकुल कंबर पकडत उठतो, विद्या मॅडम कडे बघून जीभ चावतो…

आकाश तिथे जाऊन जिंकल्यासारखा मागे येतो…
विद्या हाताची घडी घालून त्याच्याकडे बघते…

“रेसिंग ची स्पर्धा होती का ही?”

“आं?? मग कसली होती?”

“लक्ष कुठेय आकाश…”

“हमम…क्रांतिवीर हम…चले साथ साथ…”

मागची मुलं आकाश ला चिडवतात…

विद्या च्या लक्षात येतं, क्रांती अन आकाश चं काहीतरी सुरू आहे..यांना बघू नंतर म्हणत विद्या दुसऱ्या मुलांची स्पर्धा घेते…

कुणालाही दिलेल्या वेळात एकसारख्या स्पीड मध्ये जाता आलं नाही…मग विद्या सर्वांना जवळ बोलावते…आणि सांगते…

“इथे mathematics वापरलं जातं…स्पीड चा फॉर्म्युला काय?”

“स्पीड equals to distance upon time..”

“पाठ आहे..पण वापरता आलं नाही तुम्हाला…”

मुलं एकमेकाकडे बघतात..

“ए साक्षी, वही पेन काढ पटकन…मला आलं लक्षात…”

“आपल्याला स्पीड काय ठेवावा लागेल हे काढू…डिस्टन्स 0.5 km आहे…टाइम 70 सेकंद दिलाय, तो तासात convert करू… 1 तास म्हणजे 3600 सेकंद, मग 70 सेकंद म्हणजे…”

“70 भागीले 3600…कर पटकन..”

“0.019 hour..”

“स्पीड काढ ..”

“Distance divided by time…म्हणजेच 0.5 divided by 0.019..”

“26.31 km/hr… एवढा स्पीड पाहिजे…”

साक्षी मैत्रिणीला घेऊन तिची गाडी सुरू करते…
गाडीचा स्पीड बरोबर 26 कॅग्या आसपास ठेवते…आणि बरोबर दिलेल्या वेळात ती त्या ठिकाणी एकसारखा स्पीड ठेऊन पोचते..”

“Yessss…you have done it…”

विद्या टाळ्या वाजवते… साक्षी खुश होते…स्पीड चा फॉर्म्युला आज विद्या ने प्रात्यक्षिकासह शिकवला होता…
आणि मुलांना आता तो आयुष्यभर लक्षात राहणार होता…

आता विद्या आपला मोर्चा आकाश आणि क्रांती कडे वळवते…

“कॉलेज सुटलं की भेटा मला दोघे..”

विद्या आता त्यांना काय समजावते पहा पुढील भागात…

क्रमशः

Leave a Comment