मस्ती की पाठशाला – भाग 2

 

त्या प्रसंगानंतर ट्रस्टी लोकांच्या आग्रहाने विद्या कॉलेज मध्ये रुजू होते. त्या कॉलेज ला काम मिळायला खरं तर नशीब लागायचं…पगार भरमसाठ आणि विद्यार्थ्यांना जास्त शिकवायची तसदी नव्हती….विद्यार्थी वर्गात बसतील तर शपथ…त्यामुळे प्रोफेसर लोकांचं धकुन जात होतं…

विद्या चा पहिला दिवस..छान कॉटन चा पंजाबी ड्रेस घालून ती तयार झाली..तिची पर्स घेतली, फ्रीज मधून पाण्याची बाटली घेण्यासाठी फ्रीज उघडलं…काल वडिलांनी वाटलेल्या पेढ्यांचं बॉक्स अजून फ्रीज मध्ये होतं.. त्यात 4-5 पेढे शिल्लक होते. वडिलांचा आनंद त्या बॉक्स मधून झळकत होता. तिने पाण्याची बाटली घेतली अन ती कॉलेज ला जायला निघाली.

पहिलाच दिवस..मनात धाकधूक होती. वर्गातली मुलं कशी असतील? कसा प्रतिसाद देतील? अशी एक ना अनेक प्रश्न घेऊन ती कॉलेजला पोहोचली. स्टाफ रूम मध्ये तिने पाऊल ठेवलं. सर्व शिक्षक मोबाईल मध्ये गुंग होती. सावंत सरांचं लक्ष तिच्याकडे गेलं..

“या मॅडम..अभिनंदन… तुम्हाला इथे नोकरी मिळाली…”

सावंत म्हणाले तसे इतर प्रोफेसर वर पाहू लागले. त्यांनीही स्वागत केलं.

“मग…मॅडम पूढे काय करायचं ठरलंय?”

“म्हणजे?”

“म्हणजे कुठली परीक्षा देणार…प्रमोशन हवंय ना?”

“आधी मुलांना घडवू तर देत..”

“काय?”

“अहो मी या पेशाकडे केवळ नोकरी म्हणून नाही..तर मुलं घडवायची एक जबाबदारी म्हणून बघतेय…”

तिच्या या वाक्यावर सर्व शिक्षकवर्ग हसायला लागला..

“अहो मॅडम…तो जमाना गेला आता..मुलं आधीसारखी नम्र राहिली नाही…त्यांना जर आपल्या बद्दल आदर नाही तर आपण तरी का खटाटोप करायचा?”

“बरोबर आहे..मुलं आधीसारखी राहिली नाही…कारण शिक्षकही आधीसारखे आता नाहीत..”

“तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही कमी पडलो का?” प्रोफेसर मधले एक सिनियर जोशी सर चिडले…

“मला कारण माहीत नाही…पण हेच सत्य आहे..”

जोशी आणि विद्या मध्ये पाहिक्याच दिवशी खटके पडले… सावंत सर मध्ये पडले..

“मॅडम…या तुम्हाला कॉलेज दाखवतो..”

सावंत विद्या ला कॉलेजची माहिती करून देत होते..

“सावंत…जोशी सर म्हणाले ते पटतंय का तुम्हाला?”

“मॅडम..खरं सांगू? इथले शिक्षक केवळ उपजीविका म्हणून या पेशा कडे बघताय…मी स्वतः प्रयत्न केला मुलांना चांगलं घडवायचा…पण..”

“पण काय..”

“मुलांनी तर सोडाच…या प्रोफेसर लोकांनीच मला खाली खेचलं..”

“तुम्ही माघार घेतलीत?”

“एका शिक्षकाला दुसरा शिक्षकच आदर देत नाही, त्याची खिल्ली उडवतो…तिथे विद्यार्थी तरी कसला आदर देतील?”

“असं आहे तर..”

“जाऊद्या मॅडम..आज तुमचा पहिला दिवस..कुठे आहे आजचा तास?”

“अकरावीच्या वर्गात… Mathematics शिकवायचं आहे..”

विद्या ला तिचा वर्ग दाखवण्यात येतो…ती वर्गात शिरते..मुलं गडबड करत असतात…कुणाची मारामारी चालू असते, कुणी मोठमोठ्याने घोळका करून हसत असतं… विद्या ला पाहून सर्वजण उभे राहतात…

“गुड मॉर्निंग मॅडम…”

“गुड मॉर्निंग…sit down…”

मुलं बसतात..बसता बसता कुणीतरी एक taunt मारतं.. अन सर्वजण हसतच खाली बसतात…

“माझं नाव विद्या…विद्या जगदाळे..”

“विद्या विनयेन शोभते..”

एक विद्यार्थी हळूच मागून बोलतो अन पुन्हा वर्गात हशा पिकतो..

विद्या मार्कर पेन उचलते..आणि बोर्ड वर काही वेगवेगळ्या आकृत्या काढते……ग्रह…सूर्यमाला…व्हॅन…tv… मोबाईल…

मुलं अचानक शांत होतात…math शिकवणार होत्या..हे काय काढलंय?

“तर..आपण math शिकण्याआधी math खऱ्या आयुष्यात कुठे वापरलं जातं हे शिकूया….”

क्रमशः

(ही कथा आहे एका प्रोफेसर ची…जिला बदलायची असते व्यवस्था, जिला बदलायची आहे एक पिढी अन घडवायचा आहे एक सकारात्मक समाज…तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्याच कलेने घेऊन त्यांच्यात सकारात्मक बदल, त्यांच्यातील कलागुणांना वाव देऊन विद्या so called टुकार विद्यार्थ्यांची लाडकी कशी बनते…आणि अशी अनेक रोचक वळणं… बघा पुढील भागात..)

Leave a Comment