मस्ती की पाठशाला (भाग 12) ©संजना इंगळे

विद्या च्या वर्गातील मुलं मॅच चा सराव करत असतात…विद्या मॅम त्यांचा सराव बघत असतात…इतक्यात जोशी सर त्यांची टीम घेऊन तिथे येतात..

हट्टेकट्टे आणि धिप्पाड मुलं…असुरांची सेना समोरून येतेय असंच दिसत होतं… जोशी सर सर्वांच्या पुढे…

“काय मग…यावेळी आमच्याशी स्पर्धा?? कशाला उगाच शक्ती वाया घालवताय…”

“ते आता मैदानात पाहू..” आकाश उत्तर देतो…

“लेडीज कोच…म्हणजे आधीच खेळायचे वांदे, त्यात दुष्काळात तेरावा महिना..हा हा हा..”

जोशी सर विद्या ला पाहून टोमणा मारतात…मुलं चिडतात… शंतनू तर हातातली बॅट घेऊन पुढे होतो तोच विद्या मॅम त्यांना मागे व्हायला सांगते…आणि सर्वांना घेऊन दुसऱ्या ग्राउंड वर जाते….

“ते आपलं मानसिक खच्चीकरण करू पाहताय. तुम्ही त्याला बळी पडू नका…मी जे सांगितलं ते करताय ना?”

“हो मॅम…रोज व्यायाम, धावणं आणि क्रिकेट प्रॅक्टिस…”

“आणि डावपेच आखले आहेत बरेच..”

अशीच तयारी सुरू राहू द्या…

जोशी सरांच्या वर्गाची टीम नेहमीप्रमाणे इतर तुकड्यांशी जिंकते…विद्या चा वर्गही जिंकत जिंकत फायनल मध्ये पोचतो…आणि तिथे त्यांची स्पर्धा असते ती जोशी सरांच्या वर्गासोबत..

मॅच चा दिवस उजाडतो…सर्वजण नर्व्हस असतात…चॅलेंज तर घेतलंय, पण तरीही मनात एक काहूर….

11 वाजतात…माईक वरून दोन्ही टीम ला मैदानात यायला सांगतात….
विद्या ची टीम दबक्या पावलांनी मैदानात उतरते…तिथे जमल्यावर विद्या त्यांना सांगते..

“माहीत आहे तुमच्यावर खूप दडपण आहे…पण हे दडपण इतकंही मोठं समजू नका..”

“असं कसं मॅम…अहो खूप टेन्शन आलंय, जर हरलो तर जोशी सर..”

“आकाश…आता मी सांगते तसं सर्वांनी करा..डोळे मिटा..”

सर्वजण डोळे मिटतात…

“आता विचार करा..आपण विमानातून प्रवास करत आहोत…सर्वजण आपापल्या जागी बसले आहेत..आणि अचानक विमान हेलकावे खायला लागतं… बाहेर जायचा रस्ता तर नसतोच…पायलट सुद्धा माघार घेतो…तुम्ही धडपडत असतात बाहेर यायला…पण दार उघडलं तर खाली मृत्यू, आत राहिलं तरी मृत्यू…”

“बापरे…काय करू काय करू आता..”

शंतनू स्वप्नात अगदी हरवून जातो…

“आता डोळे उघडा…किती टेन्शन आलेलं ना तुम्हाला? मग आता खुश व्हा की ते फक्त एक imagination होतं. त्यापुढे ही मॅच काय आहे?”

“हो यार…क्षुल्लक गोष्ट आहे ही..”

“मग आता मस्त एन्जॉय करत आणि मन लावून खेळा…जिंकला काय अन हरला काय…”

सर्वजण मनावरचं मोठं दडपण उतरवून मैदानात उतरतात…

टॉस पडतो… जोशी सरांची टीम आधी फिल्डिंग निवडते…

20 ओव्हर ची मॅच असते…

मैदानात आकाश आणि शंतनू बॅट घेऊन उतरतात…
शिट्टी वाजते आणि मॅच ला सुरवात होते…शंतनू आकाश कडे बघून एक खूण करतो, आणि आकाश त्याला होकारार्थी इशारा करतो…

पहिला बॉल…. डॉट बॉल..
दुसरा बॉल… डॉट बॉल..
तिसरा: 1 रन
चौथा: डॉट
पाचवा: डॉट
सहावा: 1 रन

शंतनू अगदी सावकाश खेळत होता..अगदी रमत गमत…आकाशही तेच करत होता..
प्रेक्षक नाक मुरडत होते..

“अरे असं कधी खेळतात का? किती स्लो…”

काहीजण विद्या मॅम ला सांगायला आले, मॅम मुलांना सांगा तुम्ही, इतकं हळू खेळू नका…

विद्या मॅम फक्त हासायच्या, त्यांचा डावपेच फक्त टीम आणि विद्या ला माहीत होता…

सुरवातीच्या काही ओव्हर्स ला अगदी संथपणे ते खेळत होते…

दुपारचे12 वाजले…सूर्य डोक्यावर आला…शंतनू ने आकाश ला इशारा केला…आणि आता दोघांची फटकेबाजी सुरू झाली…

आकाश आणि शंतनू ला माहीत होतं, की यांची फिल्डिंग कमजोर आहे, catch सोडतात ही लोकं… म्हणून दोघांनी अंदाधुंदी फटकेबाजी सुरू केली…

आणि समजा एखाद्याच्या जवळ catch आलाच, तर सूर्य डोक्यावर असल्याने त्या सुर्याकडे नजर जाताच त्यांची नजर अंधुक होऊन जाई.. आणि catch निसटून जाई…four, six… नुसता धूर…

म्हणून त्यांनी 12 वाजता या सर्वांची सुरवात केली..

10 ओव्हर झाले अन score 56 झाला…एकही आऊट नाही….जोशी टीम जरा टेन्शन मध्ये आली…

आता विक्रम ला बोलवण्यात आलं..विक्रम समोर आला अन शंतनु ला धडकीच भरली…होताच तो असा…धिप्पाड अन उंच…आकाश ने ते ओळखलं…त्याने शंतनू ला जवळ बोलावलं आणि सांगितलं..

“हा कोण आहे माहितीये??”

“विक्रम..”

“आता याला अफजलखान समज..”

शंतनू च्या अंगात जणू शिवाजी महाराजच संचारले….विक्रम च्या बॉल वर चिडून त्याने जी काही फटकेबाजी केली….ते पाहुन विक्रम सुद्धा वैतागला…
अखेर शंतनू stumpout झाला….नंतर आकाश ने चांगला score केला…तोही काही वेळाने out झाला…

नंतर आलेल्यांनी संथ खेळी केली…आणि अखेर स्कोर 140 पर्यन्त गेला…

जोशी टीमला आजवर कधीच इतकं वैतागलेलं पाहिलं नव्हतं…जोशी सर सुद्धा टेन्शन मध्ये आले होते…

आता जोशी टीम बॅटिंग साठी उतरली…
अनिकेत ने आल्या आल्याच चांगली फटकेबाजी केली…जोशी टीम निर्धास्त झाली…

आकाश ने सर्वांना इशारा केला तसे सर्वजण सतर्क झाले..अनिकेत ला ते दिसलं…तो सावकाश खेळू लागला…ऊन बरंच होतं.. अनिकेत ला एकदम स्लो बॉल टाकून त्याला 1-2 रन साठी त्याला पाळायला भाग पाडत होते. अखेर अनिकेत अनपेक्षित पणे आऊट झाला..

विद्या टीम ची योजना अशी होती की, समोरच्या टीम ला त्यांच्या यशाचा खूप अभिमान होता. त्यामुळे त्यांनी सराव फारसा केला नव्हता, परिणामतः त्यांचा स्टॅमिना कमी झालेला. अश्या वेळी त्या टीम ला दमवून त्यांची क्षमता कमी करायची असा यांचा डाव होता…आणि त्यानुसार सगळं चाललेलं… संथ बॅटिंग मूळे आधीच विद्या टीम ने जोशी टीम ला दमवलं होतं.. आणि असे दमलेले खेळाडू बॅटिंग ला आले…त्यांना रन साठी पाळायला लावून अजून दमवलं. आणि अखेर स्टॅमिना संपल्यांने अनिकेत ने माघार घेतली.
विद्या टीम ने सततचा सराव आणि व्यायाम करून आपला स्टॅमिना बराच वाढवला होता…त्यामुळे त्यांना काहीही अडचण आली नाही..

नंतरचे बॅट्समन आले…19 वी ओव्हर. 130 रन पूर्ण
आता 6 बॉल मध्ये 11 runs हवे होते..
बॅटिंग करायला समोर प्रतीक…
काय करावं काही सुचेना..
पहिला बॉल: 2 रन
दुसरा: 1 रन
तिसरा: फोर
चौथा: 2 रन
पाचवा: 0

सहाव्या बॉल ला 2 रन हवे होते… ते विक्रम आरामात काढणार होता…जोशी टीम जल्लोषात तयार होती…आपणच जिंकणार या जोशात त्यांनी पाण्याच्या बाटल्या वगैरे हातात घेऊन ठेवल्या…

विद्या मॅम टेन्शन मध्ये…आता काहीही करू शकत नाही आपण…जे होईल ते होईल..

सर्वांच्या नजरा शेवटच्या बॉल वर…

आकाश बॉलिंग साठी पाळायला लागला..

इतक्यात विद्या मॅम च्या वर्गातील मुलींमध्ये काहीतरी कुजबुज झाली…
आकाश ने टाकलेला बॉलवर विक्रम जोरदार फटका मारायला तयारच होता.
आकाश ने टाकलेला बॉल विक्रम च्या बॉल वर आपटणार इतक्यात..

इतक्यात…

विद्या मॅम च्या मुलींमधून एक मंजुळ आणि प्रेमभरा आवाज मैदानात आला..”विक्रम……..”

विक्रम त्या आवाजाने पुरता पिघळला…त्याची बॅट चुकली अन बॉल तडक स्टंप वर जाऊन आदळला..

विद्या टीम मध्ये एकच जल्लोष… पूर्ण वर्ग मैदानात धावून आला…वर्ल्ड कप जिंकण्या पेक्षा जास्तीचा आनंद साजरा करण्यात येत होता…मुलं पाणी उडवत होते, काहीजण नाचत होते..काय करू अन काय नको असं झालेलं त्यांना…जोशी टीम चा तर चेहरा बघण्यासारखा झालेला…जो तो आपलं तोंड लपवत होता..

क्रमशः

1 thought on “मस्ती की पाठशाला (भाग 12) ©संजना इंगळे”

Leave a Comment