मस्ती की पाठशाला (भाग 11) ©संजना इंगळे

परीक्षा संपते, पेपर अगदी छान गेलेले असतात. कॉलेजला सुट्ट्या लागतात. पण मुलांचं मन काही घरात रमत नाही, विद्या मॅम चा वर्ग, एकत्र मिळून केलेली धमाल… याची मुलांना सवय झालेली.

सुट्ट्या सम्पतात, कॉलेज पुन्हा सुरू होतं. आता कॉलेजमध्ये इव्हेंट सुरू होतात, sports डे, gathering, dj… फुल to धमाल…

दरवेळी प्रमाणे मुलं विविध activities मध्ये भाग घेत असतात.
स्पोर्ट्स डे सुरू होतात..क्रिकेट च्या मॅचेस म्हणजे एक युद्ध जणू…चार डिव्हिजन मधल्या मुलांमध्ये स्पर्धा होत असतात…यावेळी खरी फाईट असते ती विद्या आणि जोशी सरांच्या वर्गात.

जोशी सरांच्या वर्गात अगदी धिप्पाड आणि उंच मुलं होती..आजवर क्रिकेटचं विजेतेपद तेच नेत आले होते…

यावेळी विद्या च्या वर्गाने विचार केला, की टीम बनवायचीच नाही..

“अरे त्या पाहिलवनांसमोर काही टिकाव लागत नाही आपला…दरवेळी हरतो आणि आपल्याला चिडवतात ते.यावेळी नकोच टीम बनवायला…”

“हा यार..फुकट वेळ अन शक्ती वाया जाते..”

त्यांचं हे बोलणं विद्या ऐकते..

“हरण्याच्या भीतीने आधीच माघार घ्यायची नसते..”

“मॅम? तुम्ही?”

“काय बोलत होतात तुम्ही?”

“मॅम, आम्ही अभ्यासात दुसऱ्यांना हरवू शकतो पण हे क्रिकेट अन तेही जोशी सरांच्या वर्गासोबत…नको रे बाबा…मॅम तुम्हाला माहीत नाही…आजवर ते कधीही हरले नाहीत…”

“ते हरले नाहीत कारण तुम्ही त्यांना जिंकू दिलं ..”

“म्हणजे?”

“माणूस मनाने हरला की कायमचा हरला…तुम्ही मनाची तशी तयारीच करून घेतली असेल तर तुम्ही हरणारच…”

“काय करू मॅम आम्ही?”

“माईंड गेम..”

“माईंड गेम?”

“युद्धय मैदानात जिंकण्या पेक्षा मैदानाबाहेर जिंका..”

“कसकाय?”

“शिवाजी महाराजांनी अफजलखानासारख्या धिप्पाड शत्रूला कसं मारलं आठवतंय ना?”

मुलं विचार करू लागतात…

“आठवा आपला इतिहास….शिवाजी महाराजांची सेना किती होती? मोजकेच मावळे हाताशी होते, शत्रू बलवान होता.. पण तरीही हिम्मत दाखवून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं…ही तर केवळ एक स्पर्धा आहे, प्रतिस्पर्धी च्या शक्तीने आधीच नमू नका…युद्ध असो वा स्पर्धा, शक्तीसोबतच युक्तीने जिंकलं जाऊ शकतं…”

मुलं ते ऐकून पेटून उभी राहिली…

“ए चला रे…बोलवा पोरांना…टीम तयार करायची आहे…”

आकाश सर्वांना बोलवून आणतो…टीम तयार होते…
विद्या मॅम ने सांगितलेलं त्यांच्या मनावर ठसलं जातं… आता ते जोमाने कामाला लागतात…

“आपल्याला यावेळी त्यांना हरवायचं आहे..”

“अरे पण…”

“पण बिन काही नाही, आपण त्यांचासमोर पराजित होऊ हा विचारच डोक्यातून काढून टाका आधी…ऐका सर्वांनी, उद्या त्यांची पहिली मॅच आहे b division सोबत…आपण नीट बघू त्यांची मॅच..आदित्य, तू पूर्ण मॅच चा व्हिडीओ काढ. आपल्याला त्यांचे बारकावे समजून घ्यावे लागतील…त्यांचे प्लस आणि मायनस पॉईंट लक्षात घ्यावे लागतील…आणि विकास, आपल्यात फक्त तू एक आहेस ज्याचासमोर त्यांना हार मानावी लागते… तू तयारी ठेव…”

विद्या मॅम येऊन एक सल्ला देतात..

“तुमच्या मॅच ला अजून बरेच दिवस बाकी आहेत, तेव्हा आजपासून रोज धावायची प्रॅक्टिस करा..तुमचा स्टॅमिना महत्वाचा आहे…तो वाढवा…”

विद्या मॅम चा सल्ला सर्वजण तंतोतंत पाळतात…

जोशी सरांच्या वर्गाची मॅच सुरू होते… आदित्य व्हिडीओ काढत असतो..आणि बाकीचे नीट निरीक्षण करत असतात..

“ए अक्या..तुझ्या लक्षात येतंय का?”

“होय..”

“काय सांग बरं..”

“तुला खूप भूक लागलीये ना?”

“ए गपे…अरे ते नाही…जोशी सरांच्या वर्गातला हा अनिकेत..जाम फोर सिक्स ठोकतोय…”

“मग?”

“त्याला फक्त ऑन साईड ला मारता येतंय… दुसऱ्या बाजूने बॉल आला की डॉट बॉल…”

“राईट…याच्यासाठी ऑफ साईड ला टाकणारा बॉलर लागेल…”

त्यांची आता बॉलिंग सुरू होते…

बॅटिंग कितीही चांगली केली असली तरी फिल्डिंग मध्ये त्यांचे खूप catches सुटले…याचाच फायदा आता घ्यायला हवा…

त्यांच्यात एक विक्रम नावाचा खेळाडू असतो, बॉलिंग अन बॅटिंग दोघांमध्ये तरबेज… खरं तर मॅच एकटाच ओढून आणत असे..

मॅच तेच जिंकले, आकाश सर्वांना घेऊन वर्गात आला, प्रोजेक्टर चालू केलं अन काढलेला व्हिडीओ लावला…
सर्व वर्ग बारकाईने तो पाहू लागला…विद्या मॅम पण येऊन बसल्या…

मुलांनी डावपेच आखले आणि एकमेकांना सूचना दिल्या..
तिकडे विद्या मॅम मुलींसोबत बसून व्हिडीओ बघत होत्या, त्यांना व्हिडिओत काहीतरी दिसलं… मॅम आणि सर्व मुली जोरजोराने हसू लागल्या..

“काय झालं ?”

“काहीं नाही…लेडीज talk…”

मुलांना काही समजलं नाही…त्यांनी आपलं काम चालू ठेवलं…

क्रमशः

2 thoughts on “मस्ती की पाठशाला (भाग 11) ©संजना इंगळे”

Leave a Comment