मस्ती की पाठशाला (भाग 10)

 

प्रिन्सिपल सरांकडून झालेला अपमान जोशी सरांच्या जिव्हारी बसतो…ते वर्गात येतात..पूर्ण वर्गाकडे एक कटाक्ष टाकतात..

“हे काम कुणी केलं मला माहीत नाही…मी आत्ता नाही बोलणार तुम्हाला काही, पण जेव्हा परीक्षा होईल आणि रिझल्ट येईल ना, तेव्हा मला भेटा…बघू, math मध्ये काय काय दिवे लावताय तुम्ही..चॅलेंज आहे माझं…”

नंतर विद्या मॅम चा तास असतो, वर्गात आल्यावर मुलं काळजीत दिसतात…

“आज काय झालं तुम्हाला?”

दिशा उभी राहून मॅम ला सर्व हकीकत सांगते..

“म्हणजे जोशी सरांना असं वाटतंय की तुम्ही math मध्ये मागे पडणार…काळजी कसली मग? Math चा अभ्यास येतोय की तुम्हाला चांगला..”


“मॅम, ते खरंय, पण math बाबतीत आमच्या मनात एक भीती असते कायम, इतर विषयांचं तसं नाही..”

“मग मनातली ही भीती आधी काढून टाका…चला, आपले 2 युनिट बाकी आहेत, वेळ कमी आहे…वह्या काढा सर्वांनी..”

इतक्यात वर्गात सूचना येते..

“कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कॉलेज ला 15 दिवस सुट्ट्या…”

ते ऐकून वर्ग अजून चिंतेत पडतो…15 दिवस सुट्ट्या, syllabus केव्हा होणार पूर्ण? परीक्षेत काय लिहणार?

विद्या सुद्धा काळजीत पडते, पण ती मुलांना समजावते..

“या क्षणी देशाचं आणि आपलं आरोग्य जास्त महत्वाचं आहे…त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या..”

“ते ठीक आहे मॅम, आम्हाला syllabus किंवा अभ्यासाची भीती नाही, पण जोशी सरांचं चॅलेंज जर हरलो, तर आम्हाला नको नको करून टाकतील ते..”

विद्या विचारात पडते…हे सगळं अनपेक्षित होतं… जोशी सरांचं चॅलेंज काहीही केल्या हरायचं नव्हतं, नाहीतर ते मुलांना किती अपमानास्पद वागवतील याचा नेम नाही..

सर्वजण घरी जातात…

त्या रात्री विद्या आणि सर्व मुलं चिंतेत असतात…

दुसऱ्या दिवशी सर्वजण आपापल्या घरी मोबाईल वर असतात..अचानक सर्वांच्या मोबाईल वर एक नोटिफिकेशन येतं..

“Join multi user video conference call..”

आकाश चा हा उद्योग…सर्वजण कुतूहलाने ते app इन्स्टॉल करतात…आकाश एक कॉल देतो अन पूर्ण वर्ग एका स्क्रीन वर दिसायला लागतो…

“अरे आकाश…काय आहे हे??”

“मॅडम..कोरोना आपल्या मोबाईल मध्ये तर काही घुसणार नाही…आता रोज आमचं लेक्चर घ्या इथे..आम्ही सर्वजण ऑनलाइन येऊ…याला ना सर्व??”

“हो..आम्ही येऊ..”


पूर्ण वर्ग व्हिडिओ conference द्वारे स्क्रीन वर एकत्र येतो आणि विद्या चा वर्ग पुन्हा सुरू होतो..आकाश ला या कल्पनेबद्दल शाबासकी दिली जाते…

रोज 2-2 तास मुलं virtually क्लास अटेंड करू लागली…त्यांचा घरच्यांना कौतुक लागलं ते वेगळंच…

10 दिवसात पोर्शन पूर्ण होतं, पुढचे 5 दिवस रिविजन…

विद्या सुटेकचा निश्वास सोडते…चला…आता तुम्ही अभ्यास करायला मोकळे..

“हो मॅम…चॅलेंज काही केल्या हरणार नाही आम्ही…”

मुलं जोमाने अभ्यासाला लागतात…
काही महिन्यांनी परीक्षा होते…math चा पेपर असतो, नेमके जोशी सर supervision ला असतात.

“काय मग…syllabus तर अर्धाच शिकवलाय…काय लिहणार पेपर मध्ये??”

मुलं तोंड लपवत हसत होती..काय सांगणार यांना..

अर्धा तास होतो, जोशी सर दिमाखात सर्वांकडे पाहत असतात…

“Math कसलं solve करता येणारे यांना…उगाच काळं करताय…”

इतक्यात मागून एक आवाज येतो..

“सर…सप्लिमेंट प्लिज…”

“इतक्या लवकर सप्लिमेंट??”

सर संशयाने त्याच्याकडे पाहत पुरवणी देतात…

ते देत नाही तोच पुढच्या बेंच वरून आवाज…

“सर सप्लिमेंट…”

जोशी सर त्याला देत नाही तोच अजून 2 मुलं..

“सप्लिमेंट प्लिज..”

एकेक करत सर्व वर्ग सप्लिमेंट मागू लागतो…
जोशी सर नुसते इकडून तिकडे पळत असतात आणि रुमालाने कपाळावरचा घाम टिपत असतात..

असं करत करत वर्गातल्या सप्लिमेंट संपून जातात, त्या आणायला आणि त्यावर सह्या करायला जोशी सरांची चांगलीच धावपळ होते…

परीक्षा सम्पतात, रिझल्ट ला अजून अवकाश असतो, कॉलेज मध्ये आता इव्हेंट सुरू होणार असतात, फुल्ल धमाल…gathering, डान्स, गाणे, डीजे….सर्वजण आता मोकळे झालेले असतात, यावेळी gathering मध्ये नवीन काय करायचं असा प्रश्न सर्वांना पडतो…

क्रमशः

1 thought on “मस्ती की पाठशाला (भाग 10)”

Leave a Comment