मवाली सून (भाग 7)

भाग 6
https://www.irablogging.in/2020/04/6_21.html

लक्ष्मी कशीबशी नशेत असलेल्या सासूबाईंना घरी घेऊन जाते. घरी कुणाला समजलं तर अनर्थ होईल हे तिला माहीत होतं. ती हळूच दार उघडते,

“अगं शोभा..लक्ष्मी… कुठे होता इतका वेळ?”

“फोन करतोय लागत पण नाही फोन..”

लक्ष्मी ला आता घामच फुटतो…सासूबाई अजूनतरी शांत असतात…अचानक सासरेबुवांकडे बघत..

“बाळासाहेब..”

सासूबाई सासरेबुवांच्या गळ्यात पडतात.

“बाळासाहेब??? कोण बाळासाहेब??”

“डॅडी अहो आईंना खूप झोप आलीये…झोपेत बोलताय..एक काम करा..मी आईंसोबत झोपते..आजच्या दिवस तुम्ही निखिल च्या खोलीत झोपा..”

सासरेबुवांना आणि निखिल ला काहीच समजत नाही काय चालले आहे ते..ते गपचूप खोलीत निघून जातात..

दुसऱ्या दिवशी…

सासूबाई डोळे चोळत उठतात..डोकं जड झालेलं असतं.. सगळं अंधुक दिसत असतं… सगळं स्पष्ट दिसायला लागतं तेव्हा लक्ष्मी चहा घेऊन उभी असते..

“मी स्वप्नात तर नाही ना..?”

“नाही SB..घ्या…”

सासूबाई चहाचा एक घोट घेतात…

“माझं डोकं जाम जड झालंय… काल केव्हा आलो आपण घरी?? आणि डोकं का जड वाटतंय मला?”

“कल तुने शराब पी ली थी SB..”

सासूबाई तोंडातला घोटाची चुरकन पिचकारी सोडतात..

“काय????”

“वो वेटर आयेला था ना…उसने पानी की जगह दारू रख दि और तुने पानी समझकर पी ली..”

सासूबाई संतापाने लाल होतात..

“लक्ष्मी…तुझ्यामुळे हे दिवस पाहायला मिळाले…बस झालं आता…यापुढे मी तुझ्या सोबत येणार नाही..”

इतक्यात दारात पोलीस येतात…

“लक्ष्मी इथेच राहते का?”

लक्ष्मी आणि सासूबाई बाहेर येतात…

“तुम्हाला अटक करण्यात येत आहे..”

“का? झालं काय?”

“50 लाखाचे हिरे चोरीला गेले आहेत..आणि तुमच्या गॅंग मेम्बर्स कडे ते सापडले आहे..”

“काय?? कोण?”

“पक्या..”

“शक्यच नाही..”

“आम्ही पूर्ण गॅंग ला ताब्यात घेणार आहोत..पोलीस स्टेशन ला चला..”

वातावरण अगदी गंभीर होऊन जातं..हे कुठलं नवीन संकट??

लक्ष्मी त्यांचासोबत जायला तयार होते… सासूबाई तिचा हात धरतात..

“मीही आहे तुझ्या गॅंग मध्ये, मीही येणार..”

“नाही SB… तुम्हाला यात अडकू देणार नाही मी…सोडा मला..”

लक्ष्मी त्यांचा हात झटकून पोलिसांसोबत जाते..

संध्याकाळी निखिल तात्पुरत्या जामिनावर सर्वांना सोडवून आणतो..

“हे कसलं नवीन संकट ओढवलस लक्ष्मी?? चोरी पर्यन्त तुझी मजल गेली?”

“सुनबाई असं करणं शक्यच नाही..हे नक्की त्या पक्याचं काम आहे…”

पक्याला सर्वजण धरून आणतात…पक्या रडत रडत हात जोडतो..

“ताई मी फक्त तुमच्या सोबत असायचो…हे चोरीचं प्रकरण मला खरंच माहीत नाही …”

“सोडा त्याला..त्याचा काहीएक दोष नाही…यामागे दुसरंच कुणीतरी आहे..”

“सुनबाई..आता याचा शोध मी लावेन…”

“SB?”

“हो…आता तू नसतांना मी गॅंग लीडर..”

क्रमशः

1 thought on “मवाली सून (भाग 7)”

Leave a Comment