मवाली सून (भाग 6)

भाग 5
https://www.irablogging.in/2020/04/5_20.html

लक्ष्मी अन तिचे साथीदार डोळे मोठे बघतच असतात, सासूबाईंना एकदम असं काय झालं की त्यांनी असा पवित्रा घेतला?

“खबरदार पुन्हा या मुलाला हात लावशील तर…मी या मुलाला घेऊन जातेय आणि त्याचा आई वडिलांकडे सोडते…”

सासूबाई त्याला त्याच्या आई वडिलांकडे सुपूर्द करतात.

“SB, आज तो तू अपुन का भी बाप निकली..क्या हुआ तेरको आज?”

“त्या मुला मध्ये मी स्वतःला पाहिलं…”

सासूबाई सर्व हकीकत सांगतात…


“अच्छा असं आहे तर..ए SB…अभी समझा ना अपुन गुंडागर्दी कायको करता है…लोकांच्या चांगल्या साठीच…आता तुम्ही पण याचे भागीदार…ए पक्या..चल अपने अड्डे पे..जरा मूड फ्रेश करून येऊ..सुर्या बार वर घे गाडी..”

“ए ए ए सुनबाई…मी असलं काही पिणार नाही हा…”

“वो तो अपुन भी नही पिता रे…खाली हॉटेल चालू नही रहता अभि कोई…फक्त ते हॉटेल चालू असतं… जेवण करू तिथे…आजकी रात, SB के नाम..”

सर्वजण बार मध्ये जातात.

“ए वेटर…बहोत भूक लगी है, जो भी तैयार हे वो ले आना..”

वेटर लक्ष्मी आणि सासूबाईंचा अवतार पाहून हसू लागतो..

“बहोत हसी आ रही है बे…चल जा निकल..”

सर्वजण बसतात…सासूबाई अजूनही त्या घटनेतून बाहेर आलेल्या नसतात…लक्ष्मी त्यांच्याकडे बघते…पक्या आणि गॅंग ला इशारा करते..

“ए पक्या..वो किस्सा सुना ना रे..”

“कौनसा..”

“वो अपुन ने कैसे माजिद भाई को पिटा था.”

पक्या रंगवून रंगवून एकेक किस्से सांगू लागतो..

शेजारच्या टेबल वर काही माणसांनी दारू ऑर्डर केलेली असते…तिथला वेटर जरा वेंधळा असतो…तो इकडची ऑर्डर तिकडे अन तिकडची इकडे देतो..

पक्या आणि गॅंग बोलण्यात गुंग असतात…टेबल वर काय आलंय याकडे त्यांचं लक्ष नसतं… सासूबाईंना तहान लागलेली असते…त्या ग्लास कडे न बघता तोंडाला लावतात…आणि घटाघाटा पिऊन टाकतात..

ग्लास खाली झाल्यावर वेटर येतो..

“सॉरी सॉरी…”

असं म्हणत ट्रे उचलतो, एक ग्लास रिकामा पाहून तो घाबरतो अन पटकन निघून जातो..

“ए क्या रे??”
लक्ष्मी अन गॅंग ला झालेला प्रकार लक्षात येतो..

लक्ष्मी डोक्याला हात लावते..थोडा वेळ सर्वजण सासूबाईंकडे बघतात..

सासूबाई आता तर्रर्रर्र झालेल्या असतात..

“तुला सांगते सुनबाई…त्या बाळासाहेबशी लग्न केलं असतं तर आज राणीसारखी राहिली असती मी..”

“कोण बाळासाहेब?”

“होता…मेरा पेहला प्यार…काय माणूस होता तुला सांगते…आम्ही सर्व पोरी त्याच्यावर फिदा होतो..”

पक्या तोंड दाबून हसायला लागतो…

“जाऊद्या सासूबाई…हे घ्या खाऊन घ्या..”

“बोलू दे मला…अरे त्याच्यावर इतकी लाईन मारली इतकी लाईन मारली की शेवटी त्याने त्याची लाईनच बंद करून टाकली… गेला त्या सुरेखा सोबत निघून…”

“जाऊद्या SB… सासरेबुवापण चांगले आहेत..”

“बोलू दे मला…तुला सांगते मी ..लग्न केलं अन आयुष्य नरक बनलं.. ना कुठे फिरायला जाणं ना कुणाशी बोलणं… नव्याने नऊ दिवस सम्पत नाही तोच निखिल आला..तुला माहितीये निखिल कसा झाला ते??”

“ए वेटर..लिंबू पाणी आन.. पटकन..”

आता सासूबाई पुढे काही बोलणार इतक्यात त्यांचा तोंडाला लिंबूपाणी लावलं..

सासूबाई थांबायला तयारच नव्हत्या…

“ए लस्क…लक्स…लक…”

“लक्ष्मी..”

“हा तेच ते…पण तू खरी बाय माझी..लय केलंस तू सर्वांसाठी… आता आपण तुझ्या सोबतच राहणार…फुल ऱ्हाडा घालणार, एकेकाला ठोकणार…”

क्रमशः


1 thought on “मवाली सून (भाग 6)”

Leave a Comment