मवाली सून (भाग 2)

भाग 1
https://www.irablogging.in/2020/04/1_15.html

मामांना सुनबाई बघताच भोवळ यायला लागते…शोभा अक्का मामाला धरून आत घेते…सोफ्यावर बसवते..पंखा सुरू करते..

“दादा, बरा आहेस ना? काय होतंय??”.

मामा घामेघुम झालेले असतात…

“अगं ही…ही…ही तुझी सून लक्ष्मी??”

“Call me lucky…. हेय MS….आनेवाला था तो बताने का बाबा…तेरे लिये मस्त 🍺 सोय करती ना मैं…जानदे…ओ SB… आपण रात्री बाहेरच जेवणार आहे…आपला स्वयंपाक नका करू…चलो बाय मामु…बाय SB”

“ए ए ए काय बोलतेय ही…SB काय?? MS काय??”

इतक्यात निखिल मागून येतो, लक्ष्मी चा नवरा…

“SB म्हणजे सासुबाई…MS म्हणजे मामासाहेब…”

“अरे देवा….काय चाललंय हे….”

“दादा तू शांत हो आधी…”

“कसकाय शांत होऊ…. अगं तुझी सून..”

“ऐकून तर घे…आमची लक्ष्मी तू म्हटला अगदी तशीच होती बघ…शांत, सोज्ज्वळ, संस्कारी….एकदा किचन मध्ये काम करताना ती जोरात पडली आणि डोक्याला मार लागला…दवाखान्यात नेलं…शुद्धीवर नव्हती ती…डॉक्टर म्हणाले की केस अवघड आहे, एक तर कोमा मध्ये जाईल, नाहीतर हिची स्मृती जाईल, नाहीतर हिचं व्यक्तिमत्त्वच बदलून जाईल…”

“असं कधी असतं का..”

“आम्हीही हेच म्हटलं डॉक्टर ला…पण ते म्हणाले की मेंदूत काही गडबड झाली तर माणूस काय बनू शकतो याचा काही नेम नाही..”

“मग?”

“मग काय, हिला शुद्ध आली अन….स्वतःला ती भाई समजतेय…सगळीकडे भाईगिरी करत फिरतेय, स्वतःची गॅंग बनवलीये तिने. भांडणं काय, मारामाऱ्या काय विचारूच नका..”

“अरे निखिल तू तरी कसा सहन करतोय अश्या बायकोला..”

“मामा काहीही झालं तरी बायको आहे ती माझी…आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की तिला त्रास होईल असं काहीही वागायचं नाही…नाहीतर तिच्या डोक्यावर अजून परिणाम होऊन परिस्थिती वाईट होऊ शकते…”

शोभा अक्का तोंड वाकडं करत निखिल कडे बघते अन बडबडते..”बायकोचा बैल मेला…”

“दादा आता शांत हो बघू, तर असं आहे सगळं…आता समजलं ना?”

मामा अजूनही घाम पुसत असतात..

“अरे दादा इतकं काय टेन्शन घेतोय तू? आम्ही सहन करणार आहोत तिला, तुला टेन्शन घ्यायची काय गरज आहे इतकी?”

“अरे…गोष्ट तर पुढे आहे…संध्याकाळी तुझी वहिनी आणि माझी सून येणार आहेत घरी…माझी सून माहितीये ना तुला..बोलायला नुसती वाचाळ.. तिला मी नेहमी लक्ष्मी चं उदाहरण द्यायचो…पण लक्ष्मी चा हा अवतार पाहून आमची काय इज्जत ठेवेल गं ती?”

“दादा अरे हे काय करून बसलास..मला आधी कळवलं असतं तर…निखिल…काय करायचं…”

“तुम्ही काळजी करू नका…मी लक्ष्मी ला बरोबर तयार करतो..”

नंतर निखिल लक्ष्मी ला शोधून गाठतो…हो गाठतोच… भेटत नाही…त्याला गाठावच लागायचं…कारण लक्ष्मी आता कुठल्या गल्लीत जाऊन ऱ्हाडा घालत असेल याचा अंदाज लावणं कठीण होतं..

“बता…किसने चुराया तेरा पैसा… कसा होता तो चोर?? साला अपुन के इलाके अपुन होते हुए चोरी? ..”

“असा सावळा होता…उंच होता…आणि कपाळावर उजव्या भुवयीला एक तीळ होती..पैसे घेऊन पळताना पाहिलेलं त्याला…”

“अपुन धुंड निकालेगा उसको, समझा ना…”

गल्लीत काही प्रकरण घडलं की पोलिसात जात नसत हल्ली, कारण अर्धी कामं आता लक्ष्मी निपटून घेई..

“लक्ष्मी…इकडे ये..”

“क्या बे…बोला ना लकी बोलने का…तू तो है हीच लकी…मेरसे शादी हुई तेरी…”

“हो गं बाई…आहे मी कमनशिबी..”

“क्या बोला??”

“कमी नशिबी आहे का मी…किती नशिबवान आहे..”

“हां…”

“बरं ऐक… संध्याकाळी मामांची सून आणि आई येणार आहे…त्यांच्यासमोर जरा बाई सारखी राहशील प्लिज?”

“ए…हें असलं काही करणार नाही मी…साडी नेसु? आणि त्यांना खायला प्यायला द्यायला किचन हॉल किचन हॉल वाऱ्या करू?? जमणार नाही…”

“ए प्लिज ना ..माझ्यासाठी? तुझं माझ्यावर प्रेम आहे ना..”

“ठेवला…दुखऱ्या नसेवर बोट ठेवला…बरं चल…पण एकच दिवस हा..”

लक्ष्मी ला कसंबसं तयार केलं जातं…संध्याकाळी मामी आणि तिची सून येते..जिना चढत असताना..

“मामांची बहीण वाटतं… गरीबाच्या घरी दिलेली दिसतेय..”

“अगं पुष्पा… तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही…इथे तरी गप रहा..”

“राहीलं… जळलं मेलं माझंच तोंड दिसतं..”

त्या दोघी दारात जाताच लक्ष्मी पूजेचं ताट घेऊन उभी..साडी, डोक्यावर पदर….त्यांना ओवाळते…पुरेपूर पाहुणचार करते…

“बघ…सुनेने कसं वागावं बघ जरा…नाहीतर तू..”

मामी पुष्पा ला सांगत होती….

मामा च्या जीवात जीव आला…त्यांना आता निरोप घ्यायचा होता…सर्वजण त्यांना निरोप द्यायला दारात जातात..मामा, मामी आणि पुष्पा दारापासून थोडं पुढे उभ्या असतात..त्यांच्या मागून एक माणूस जाताना दिसतो…सावळा रंग, उंच, कपाळावर उजव्या भुवयीला तीळ..

“ए रुक साले… चोर की औलाद….मेरे ईलाके मे चोरून करता है..”

लक्ष्मी परकर मध्ये खोचलेला सुरा बाहेर काढते आणि त्याच्या मागे पळत सुटते. मामी आणि पुष्पा आ वासून बघतात….मामा कपाळावर हात मारून घेतात….

क्रमशः

3 thoughts on “मवाली सून (भाग 2)”

Leave a Comment