“शक्यच नाही, अहो तिला साधा कधी तापही आला नव्हता, मग असं अचानक कसं होऊ शकतं? तिला जगावं लागेल…अजून कितीतरी जबाबदाऱ्या बाकी आहेत..माझ्या बहिणीचं डोहाळजेवण अर्धवट राहिलं… धाकटी परदेशी चालली तिची….”
त्याचं वाक्य पूर्ण होत नाही तोच त्याच्या गालावर खाडकन आवाज आला..
तिची आई आज पेटली होती, तिच्या डोळ्यात अंगार दिसत होता..
“याचसाठी हवी होती का माझी लेक तुम्हाला? तिने काय करावं हे सांगत गेले..पण तिला काय हवं विचारलं? माझी लेक दोन दिवस माझ्याकडे यायची, मन हलकं करायची…वाटायचं लेकीला सोडवून आणावं…पण माझी मजबुरी नडली…वाटायचं तिचा नवरा आहे तिला समजून घ्यायला…पण तुम्ही तर तिची तीही वाट बंद केलेली…घरात शांतता रहावी म्हणून कित्येक वादळं तिने मनातच कोंडून ठेवली… आणि माझ्याकडे कटकट करायची नाही असं सांगून तुम्ही त्या वादळांना मोकळंही होऊ दिलं नाही..माझ्या लेकीत होती ताकद म्हणून कित्येक वादळं उरात घेऊन जगत होती..पण वादळांची ताकद कमजोर पडली म्हणून ती त्यांच्या वाटेने बाहेर पडली…त्यात माझ्या लेकीचा जीव गेला…या सगळ्याला तुम्हीच कारणीभूत आहात जवाईबापू… फक्त तुम्ही..”
असं म्हणत आईने आक्रोश सुरू केला..
पण आता कुणीही काहीही केलं तरी उपयोग होणार नव्हता…
****
स्त्रियांच्या मनात न रुचलेल्या, न पटलेल्या, अन्याय झालेल्या अनेक गोष्टी साचत जातात..
कुणाला त्रास नको म्हणून या वादळांना त्या आतच बंदिस्त करून टाकतात..
ही बंदिस्त वादळं शरीर पोखरून काढतात…
आणि मग ध्यानीमनी नसतांना तिच्या सारखं होतं…
तिला कधी आजार नव्हता असं नव्हतं,
तिचं कधी काही दुखायचं नाही असं नव्हतं..
कुठलीही गोष्ट अचानक होत नसते…
पण ती कुणाला कळू न देण्याची चूक तिने केली..
कारण दुखण्यापेक्षा आपल्या माणसाला आपली काळजी नाही याच्या वेदना भयंकर असतात..
तिला त्याच वेदना नको होत्या..
म्हणून ती आज त्यातून बाहेर पडली, कायमचीच…
समाप्त
अगदी खरी परिस्थिति आहे.
म्हणून सहनशील होताना आपले स्वत्व जपावे.
Khup chaan lihilayt. Masssst.
अगदीच एक आहे माझेपण असाच अनुभव आहे देव करो आणि माझेपण अशीच वेल लवकर येवो
Khup sundar ahr
Vastvikta ahe
सतत pati kadun अपेक्षा karu नये..प्रेमळ नवरा नसेल तर स्विकार करून स्वतःला प्रेम करावे.
Ho apan satat manat theun aplyala khup tras hoto mhanun apan thoda tari apala vichar karayla pahije
As bolu naka plz kadhi tari ekant basun vichar kara koni tari mitra maitrin banva tichya javal man halak kara radavas vatel ordavas vatel je vatel te sarv kara pan plz asa vochar karu naka kadhi vatal tar mala call kara 8779147985
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.