तिला असं अचानक बेशुद्ध झालेलं बघून सगळेच धास्तावले..
आजारी पडून तिने बेड धरलेला आजवर कुणीही पाहिलेलं नव्हतं,
कधी सर्दी ताप आला तरी तिच्या कामात खंड नसायचा..
काय करणार,
लग्न करून आली तश्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या,
सासूबाईंनी अंथरूण धरलं आणि तिच्यावर सगळंच येऊन पडलं..
दोन दीर, दोन नणंद, दोन जावा आणि त्यात ही थोरली..
सर्वांची लग्नकार्य, डोहाळजेवण, बाळंतपण.. दरवर्षी काही ना काही कार्य असायचंच..
तिचा नवरा, जयदीप..
बायको म्हणून तिला आणलं तर तिच्यावर उपकार केले या भावनेने वागवणारा..
एवढं मोठं कुटुंब, भांड्याला भांडं लागायचं..
तिच्या मनात काहूर उठायचं…नवरा म्हणून जयदीपकडे मन मोकळं करायला जायची,
पण परिणाम उलटा व्हायचा..
“माझ्यासमोर असल्या कटकटी आणायच्या नाहीत, तू सुद्धा काही कमी नाही हो..जरा नीट वागत जा, जबाबदारी चं भान ठेवत जा..”
ती कुढत बसायची,
हळूहळू तिनेही नशीब मान्य केलं..आणि आहे त्या परिस्थितीत समाधान मानू लागली..
वर्षातून एकदा माहेरी जायची..
त्या दोन दिवसात आईकडे मन मोकळं करायची,
“नको नको झालंय गं आई..”
ती पोटतिडकीने म्हणायची,
आई हळूच अश्रू पुसायची,
***
भाग 3
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.