मनाचे खेळ-2

 पण फार कमी लोकं टिकू शकले,

कारण कंपनीतील राजकारण,

हेवेदावे..

वातावरण कलुषित होतं..

त्यात राठी मॅडम आणि नेरकर सर..

अनुभवी आणि उच्चपदस्थ व्यक्ती..

पण त्यांना भेदून जाणं महाकठीण..

त्यांना टक्कर दिल्याशिवाय बढती मिळणं अशक्य होतं..

पण त्याने काय केलं होतं देव जाणे, 

त्याला ते मिळालं..

आजवर अनेकांनी व्यर्थ प्रयत्न केलेले,

पण सगळं मातीमोल..

त्याने ते शक्य केलं,

मित्रांनी विचारलं,

तुझ्या यशाचं गमक तुझी बायको कशी?

तो म्हणाला,

घर असो वा कार्पोरेट,

माणसं सारखीच असतात,

स्वभाव सारखेच असतात,

मात्र त्यांना सांभाळून घेण्याची कला जमायला हवी,

माझी बायको,

लग्न करून माझ्या घरी आली,

आईच्या डोळ्यात असुरक्षितता होती,

कानामागून येऊन तिखट नको व्हायला,

आजवर घरावर तिचा हुकूम चालायचा,

पण आता सून आलीये,

ती वरचढ ठरली तर? 

माझ्या बायकोने ते हेरलं,

ही असुरक्षितता काढून टाकायची ठरवलं,

****

भाग 3

 https://www.irablogging.in/2022/12/3_3.html?m=1

Leave a Comment