मंत्र-1

सुमती बाईंचा बदललेला स्वभाव बघून सर्वांनाच आश्चर्य वाटलेलं..

सुमतीबाई, बोलायला अत्यंत कठीण,

माणसं मनातल्या मनात बोलतात,

सुमतीबाई मात्र मनातलं डायरेक्ट तोंडावाटे बाहेर काढणार,

मग कुणाला राग येवो नाहीतर वाईट वाटो,

लग्न करून आल्या तेव्हा सासूबाईंनी तिला म्हटलेलं,

“बाई चार पाच जणांचा स्वयंपाक कर..”

सुमतीबाई लगेच उत्तरल्या,

“बाई गं, आत्ताच लग्न करून आले, लगेच कामाला जुंपलं बाईने..”

तिच्या बोलण्याने घरातले सगळे अवाक झाले,

सासू सासरे अन नवरा चांगला म्हणून निभावून गेलं,

स्वभावच असा आहे, आपणच समजून घ्यायचं,

असं म्हणत संसार सुरू राहिला..

वाचाळपणा सोडला तर सुमतीबाईचं सगळं चांगलं होतं,

एका दमात पन्नास लोकांचा स्वयंपाक करू शकत,

घरातली कामं न थकता टापटीपपणे करत

त्यांच्या सासुबाई मुळात प्रेमळ,

मुलगा तिच्या वाचाळ बोलण्यावर चिडायचा तेव्हा त्या समजावत,

“पाचही बोटं सारखी नसतात बाळा, तुझी बायको साफ मनाची आहे, मनात एक अन ओठावर एक असं नसतं..”

असं म्हणत 30 वर्षे संसार चालला,

मुलं मोठी झाली,

त्यांचं लग्न झालं,

मात्र सुमतीबाईंच्या नवऱ्याला एकच टेन्शन,

आम्ही समजून घेतलं,

नवीन येणारी सून कसं सहन करेन?

पण सगळं उलटं झालेलं,

सुमतीबाई सुनेबद्दल चकार शब्द काढत नसत,

बोलल्या तर तिचं कौतुकच करत…

भाग 2 अंतिम

मंत्र-2

1 thought on “मंत्र-1”

Leave a Comment