भातुकली – 1

“मला वाटलं होतं तुमचा वारसा सुनबाई पुढे नेईल, पण इकडे तर सगळी बोंबच दिसतेय”

पापड विकत घ्यायला आलेल्या सुनीताबाईंनी खडा टाकला आणि सासूबाईंच्या जखमेवर मीठच पडलं,

सासुबाई पूर्ण गावात प्रसिद्ध होत्या,

वाळवण घ्यावं तर त्यांच्याकडूनच,

कमालीची स्वछता,

आखीवरेखीव काम,

चवीत उत्कृष्ट,

या त्यांच्या क्वालिटीमुळे गावातच नव्हे तर पंचक्रोशीत त्यांची ख्याती होती,

सासूबाईंचं लग्न झालं तेव्हा त्या अवघ्या अठरा वर्षाच्या होत्या,

गावाकडून नवरा बायको शहरात आले,

सासऱ्यांना फारसा पगार नव्हता,

त्यात शहरातील राहणीमान,

हिशोब बसेना,

त्यात अजून लहान मुलांची भर,

एकवेळ असंही ठरलं की सगळं आवरून गावाकडे निघून जावं,

पण विचार आला की शहरात मुलांचं भविष्य चांगलं होणार असेल तर पैशामुळे का मागे ठेवावं त्यांना?

सासूबाईंनी पदर खोचला,

नवऱ्याला आश्वासन दिलं,

“तुमची बायको खंबीर आहे, आपण दोघे मिळून संसाराला हातभार लावू”

सासुबाई स्वयंपाकात तरबेज, चकल्या पापडांची कामं सुरू केली,

हळुहळू व्याप वाढला, पैसाही हातात आला,

आर्थिक बाजू बळकट झाली,

सगळं सुंदर, सुखाने चालू लागलं,

सासूबाईंनी फक्त पैसा नाही, तर खूप माणसं कमावली होती,

येणाऱ्या ग्राहकाशी चांगले संबंध ठेवले,

सासूबाईंना जवळपास प्रत्येकजण ओळखत असे,

रस्त्याने चालायला लागल्या तरी लोकं आदराने चार शब्द बोलून पुढे जात,

हळूहळू मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली,

मोठ्या मुलाची बायको घरात आली,

खूप शोध घेतल्यानंतर त्यांनी सुनेला पसंत केलं होतं,

******

भाग 2
भाग 3

Leave a Comment