ब्रेकिंग: अखेर कोरोना वर औषध सापडले….

अखेर कोरोना वर औषध सापडले….

शीर्षक ऐकून चकित झालात ना? कोरोना ने ज्या जगाला काही दिवसातच बंद पाडलंय, तेच जग आज कोरोना वर एखादी प्रभावीशीर लस कधी मिळतेय याचाच विचार करत बसलेत. म्हणजे एकदा का लस आली, की बाहेर हुंदडायला मोकळे…

जगातील मृतांचा आकडा, इटली मधली भयानक परिस्थिती याचे फोटो अन व्हिडीओ सोशल मीडिया वर बघुन मनात एकच भीती…हे भारतात घडलं तर? इथल्या व्यवस्थेवर कुणाची शंकाच नाही, त्यामुळे आपल्या पर्यन्त हा रोग आला तर परिस्थिती काय होऊ शकते या भीतीने सर्वजण एकाच गोष्टीची जीव तोडून वाट बघताय…”कोरोना वरील लस..”

कोरोना वर लस मिळावी यासाठी सर्वजण अमेरिके कडे डोळे लावून बसलेत, कधी एकदा ट्रम्प लसीची घोषणा करतात अन कधी एकदाचं हे संकट जाईल याची वाट पाहणारे आपण…

आता मूळ मुद्दा..कोरोना वर खात्रीशीर इलाज…

पण हा इलाज तुम्हाला सांगितला तर तुम्ही तो पाळाल असं वचन द्या…मगच सांगते… दिलंत? बरं ऐका मग…

“चुपचाप कुठलाही आगाऊपणा आणि दीडशहाणपणा न करता दरवाजाची कडी पक्की लावून आत बसणं…हा एक सर्वात प्रभावी उपाय…कोरोनावर कसल्या लसी शोधताय, तो होऊच नये म्हणून लस असताना??

या उपायाने जर कोरोना होणार नसेल, आणि समूळ नष्ट होणार असेल तर हा साधा सोपा उपाय सोडून ट्रम्प कडे काय डोळे लावून बसलाय???

उपाय आपल्याच हातात आहे, कोरोना ला हरवण्याचं शस्त्र आपल्याच कडे आहे…असं असतांना tv लावून बातम्या पाहून कोरोना मुळे नाही पण bp वाढून तुम्ही नक्की आजारी पडाल…तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी…

कोरोना विषाणू बाहेरून पसरतोय, तो हवेत नाहीये…जोवर आपण एखाद्या गोष्टीला स्पर्श करत नाही तोवर तो आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही…
आपल्या घरी येऊन आपल्याशी दोन हात करण्याची कोरोना ची बिशाद नाही…मग जर आपण घरातच ठाण मांडून बसलो तर घरबसल्या आपण त्याला हरवू शकू ना..साधं सरळ गणित आहे…

कोरोनाबाधितांची काळजी जगातील सर्व स्तरावरील डॉकटर आपल्या जीवाची बाजी लावून घेताय, कोरोना वरची लस मिळाली तर लाखो जीव वाचतील हेही खरं… पण आपल्या हातात ते नाही…जे आपल्या हातात आहे ते तर आपण करूया….

लोकांना ‘घरबसल्या’ पगार हवा, ‘घरबसल्या’ सुविधा हव्या….मग कोरोनाशी सुद्धा ‘घरबसल्याच’ लढा द्यायचा आहे हे विसरू नका..©संजना सरोजकुमार इंगळे

vaccine on corona, medicine on corona
Vaccine on corona

2 thoughts on “ब्रेकिंग: अखेर कोरोना वर औषध सापडले….”

Leave a Comment