बना महिला उद्योजिका: संपूर्ण मार्गदर्शन (भाग 1)
या जगात जन्म घेऊन काहीतरी उल्लेखनीय करून गेलं पाहिजे या मताची मी आहे. नाहीतर “आला तसा गेला आणि उगाच भुईला भार बनला” असं साधारण आयुष्य जगायला कुणालाही आवडणार नाही. प्रत्येकजण एका वेगळ्या परिस्तिथीत जन्माला येतो, वेगवेगळी आर्थिक सुबत्ता घेऊन जन्माला येतो…पण कुठल्याही माणसातील “जिद्द” हे केवळ एकमेव गोष्ट आहे की ज्याने या बाकीच्या गोष्टी नगण्य ठरतात.
व्यवसाय या पुरुषी मक्तेदारी असलेल्या पेशा चं मला कायम कुतूहल असायचं, आणि जे काम “बायकांना जमणार नाही” अश्या ठिकाणी मुद्दामहून मी हात घालत असे. त्यामुळेच कॉलेज सोडल्यानंतर मी अनेक अश्या व्यवसायांची माहिती घेतली, काही व्यवसाय हे घरातलेच असल्याने जवळून पाहीले, आणि एक गोष्ट लक्षात आली, की स्त्री मधले जे जन्मतः गुण असतात ते जर या व्यवसायात गुंतवले गेले तर खूप काहीतरी घडू शकेल.
“मला काहीतरी करायचं आहे, काहीतरी बनायचं आहे…काय करू तुम्ही सांगा…” असं म्हणत खूप जणी माझ्याकडे येतात, पण मला वाटतं इथेच त्यांची चूक होते. आपल्याला काय करायचं आहे हे दुसरा कुणी आपल्याला सांगू शकत नाही, ती आतून निर्माण होणारी एक चमक असते. ती एक स्वयंस्फूर्ती असते. आधी आपण स्वतःला ओळखलं पाहिजे, आपण स्वतःला कुठल्या दृष्टिकोणाने बघतो?
“मी एक लाचार, गरीब, अडाणी, कमी शिकलेली, कुणाचाही सपोर्ट नसणारी अबला स्त्री आहे”
की…
“मी एक सक्षम स्त्री आहे जी प्रतिकुलतेवर मात करून परिस्थिती बदलायची धमक माझ्यात आहे…”
वरील दोघांपैकी जर दुसरं वाक्य तुम्ही स्वतःबद्दल म्हणवून घेत असाल तर जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही.
आपण कोण आहोत हे आपण “दुसऱ्याने” सांगितलेल्या मतानुसार ठरवतो…
“आई म्हणते मला नीट स्वयंपाक येत नाही…”
आई म्हटली आणि मी ते मानलं..
“नवरा म्हणतो तुला जमणार नाही, तू वेंधळी आहेस..”
नवरा म्हटला आणि मला ते खरं पटलं..
खरं पाहता आपण स्वतःची प्रतिमा स्वतःसमोर काय उभी करतो? दुसऱ्यांनी लावलेली लेबलंच आपण मिरवत असतो…आपण स्वतःला नीटसं ओळखू शकत नाही हेच खरं दुर्दैव…
एका सॉफ्टवेअर च्या कामाचं एक module मी एका फ्रेशर मुलीला दिलं, तेव्हा तिने आधीच घाबरून मला सांगितलं की तिला हे जमणारच नाही…मी विचारलं की का जमणार नाही? ती म्हणाली की मला काही येतच नाही…
“असं तुला कोण म्हणालं?”
“घरात बऱ्याचदा मला असं बोलतात..”
घरातल्या व्यक्तींचे सततचे हे वाक्य कानावर पडून तिने स्वतःला कमजोर बनवलं होतं…
“हे बघ, मी तुला सांगते की तुला हे जमेल…मला माहितीये तू किती हुशार आहेस ते आणि माझा विश्वास आहे की फक्त तूच हे काम चांगलं करू शकतेस..”
माझ्या या वाक्याने तिच्यावर असा काही प्रभाव पडला की एका अनुभवी व्यक्तीलाही जमणार नाही असं काम तिने कमी वेळात करून दाखवलं…
सांगायचा मुद्दा असा की आपण स्वतःची प्रतिमा दुसऱ्याने आपल्याबद्दल मांडलेल्या मतांवरून ठरवत असतो…
“बना महिला उद्योजिका” या सदरात मी माहिती देणार आहे अनेक अश्या व्यवसायांची जे तुम्ही आपल्या मेहनतीने पुढे नेऊ शकतात आणि त्यात यशस्वी होऊ शकतात. यात 10वी च्या आत शिक्षण असो वा उच्चशिक्षित असो…प्रत्येक वर्गाला पूरक असे व्यवसाय आहेत. केवळ लोणची पापड नव्हे तर वेबसाईट, ब्लॉगिंग, youtube, jewellary, fashion designing, manufacturing पर्यंत अनेक व्यवसायांची सखोल माहिती द्यायला मी इच्छुक आहे.
तुम्ही इच्छुक असाल तर पुढील भाग नक्की लिहीत जाईन, कमेन्ट “interested” असं टाकून आपला होकार दाखवू शकता. आणि पुढील भागांसाठी ईरा पेजला नक्की लाईक करा.
Interested
Interested
Khupach chhan idea
Interested
Interested
Interested
Interested
Interested
Interested
Interested
Interested
Intrested
Interested