फेमिनिजम ची दुसरी बाजू

 zomato delivery boy

Zomato delivery boy hitting girl

“पैशाचा माज दाखवून ही लोकं सामान्य माणसांची पिळवणूक करतात, यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे..”

“पैसा आहे म्हणून दुसऱ्याच्या बायकोकडे वाईट नजरेने बघायची परवानगी यांना कुणी दिली? यांना महिलांच्या हातात द्या, चांगलं चोपून काढतो..”

ऑफिसमध्ये मॅनेजर पदावर असलेल्या श्री. देसाईंवर भर कर्मचाऱ्यांमध्ये आरोप होत होते.देसाई त्यांची बाजू मांडण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते, इतकी वर्षे प्रामाणिकपणे काम केल्यानंतर मिळवलेला सन्मान एका क्षणात धुळीला मिळवला गेला. त्यांच्याच ऑफिसमध्ये असलेल्या एका कर्मचाऱ्याची बायको त्याला डबा द्यायला ऑफिसमध्ये आली तेव्हा देसाईंनी तिला केबिनमध्ये बोलावून तिच्याशी गैरवर्तन केले असा आरोप होता. त्या कर्मचाऱ्याची बायको केबिनमधून रडतच बाहेर आली होती आणि तिने पूर्ण ऑफिस जमा केलेलं. सर्वांना तिने झालेला प्रकार सांगितला अन सर्वजण देसाईंवर तुटून पडले होते. 

आता तुम्ही वरच्या प्रसंगावरून म्हणाल की देसाई सारख्या माणसाला शिक्षा झालीच पाहिजे. पण सत्य काहीतरी वेगळंच होतं. 

सदर कर्मचारी कंपनीत भ्रष्टाचार करत होता, देसाईंच्या लक्षात येताच त्यांनी त्याला नोकरीवरून कमी करण्याची धमकी दिली. एक वॉर्निंग देऊन त्याला एक संधी दिली गेली होती तरीही तो भ्रष्टाचार करणं सोडत नव्हता. अखेर देसाईंनी त्याला कमी करण्याबद्दल लेटर देताच त्याने त्याच्या बायकोला देसाईंच्या केबिन मध्ये पाठवलं..त्यांना नवऱ्याच्या नोकरीवर ठेवण्याबद्दल सांगायला लावलं आणि असं केलं नाही तर तुमच्यावर चुकीचा आरोप करेन अशी धमकी दिलेली. देसाईंनी परिणामाचा विचार न करता त्याला नोकरीवरून कमी करण्याच्या निर्णयाला मागे घेतलं नाही या महिलेने अखेर त्याचा फायदा घेतला.

असे कितीतरी देसाई या फेमिनिजम च्या दुसऱ्या बाजूने शिकार झालेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण जास्त तर आहेच, पण काही प्रमाणात का होईना पुरुषांवर होणारे अत्याचार हे अंधारातच राहतात आणि समोर येतो तो स्वार्थासाठी महिलांच्या कायद्याचा दुरुपयोग करणारे चेहरे. महिलांच्या कायद्याचा दुरुपयोग करून स्वार्थ साधणाऱ्या काही महिलांमुळे पुरुषांची विनाकारण बदनामी झाली आणि त्याचे परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावे लागणार होते. 

पब्लिसिटी साठी काहीतरी स्टंट देऊन फॉलोवर्स वाढवणं हा तर आजचा जणू ट्रेंडच बनला आहे. Zomato delivery boy आणि तथाकथित महिलेने केलेले आरोप हे प्रकरण सध्या देशभर गाजतय. त्यात किती सत्यता आहे, कोण बरोबर आहे कोण चुकीचे आहे याची सत्यता समजल्याशिवाय त्यावर बोलणे चुकीचे ठरेल. पण यात केवळ प्रसिद्धीसाठी एका गरीब माणसाला बकरा बनवलं गेलं असेल तर नक्कीच ही एक लज्जास्पद गोष्ट आहे. 

45 thoughts on “फेमिनिजम ची दुसरी बाजू”

Leave a Comment