प्रेम-3

 आजवर कधीही न पाहिलेलं प्रेम अनुभवत होती,

हळूहळू ती बरी झाली,

घरी आली,

नवऱ्याला विचारलं,

“पैशाची व्यवस्था कशी केली?”

“पॉलिसी काढली होती मी, आणि सोबतच काही सेविंग पण केलेली..अशी काही इमर्जन्सी येऊ शकते या विचाराने खूप आधीपासूनच जमवाजमव करत होतो..”

तिला नवऱ्याचं वेगळंच रूप दिसलं,

इतक्यात दारावर आवाज ऐकू आला,

शेजारच्या जोडप्यातला तो नवरा रडत होता,

हात जोडतच तो आत आला,

“माझ्या बायकोच्या ट्रीटमेंट साठी मदत करा मला, पैशाची खूप गरज आहे मला..”

नेत्राच्या नवऱ्याने कसलाही विचार न करता त्याच्या हातात भरपूर रक्कम टेकवली,

तो आभार मानत निघून गेला,

नेत्राने नवऱ्याकडे पाहिलं,

तो म्हणाला,

“तुझ्या ट्रीटमेंट मधून काही रक्कम शिल्लक होती ती दिली”

ती बघतच राहिली,

नवऱ्याची दूरदृष्टी केवळ तिच्या नाही, तर आजूबाजूच्या लोकांनाही मदतगार ठरली होती,

आणि शेजारच्या घरात..ते बुके, ते गिफ्ट एका कोपऱ्यात धूळ खात पडले होते…

****

प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते,

स्त्री आजचा आनंद बघत असते, तर पुरुष भविष्याच्या काळजीने आज राबत असतो..

स्त्री गुलाबाला जवळ करत असते,

तर पुरुष त्याचे काटे बोचू नयेत म्हणून काळजी घेत असतो..

हे वास्तव आहे…

26 thoughts on “प्रेम-3”

Leave a Comment