प्रेम-1

शेजारच्या फ्लॅट मधल्या जोडप्याला बघून नेत्राच्या मनात कायम खळबळ माजे,

नेत्रा बऱ्याचदा तिच्या गॅलरीतुन बघे, तो नवरा घरी येतांना कायम त्याच्या हातात काही ना काही दिसायचं,

एखादं गिफ्ट, फुलं नाहीतर चॉकलेट्स,

त्याची बायकोही कायम आनंदात असायची,

असं म्हणतात की लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस असतात,

पण त्या जोडप्याला लग्न होऊन बरीच वर्षे होऊनही नवलाई अजूनही तशीच होती,

एकदा असंच नेत्रा गॅलरीतून कपडे काढतांना तिचं लक्ष गेटपाशी गेलं,

तो नवरा हातात एक मोठा बुके घेऊन आलेला,

तिचा वाढदिवस असावा बहुतेक,

पण सोसायटीच्या ग्रुपवर कुणाचे मेसेज दिसले नाही,

म्हणजे वाढदिवस नसला तरी असं,

मग वाढदिवस असला तर, बापरे !

एवढयात दारावारची बेल वाजली,

नेत्राचा नवरा नुकताच ऑफिसमधून आलेला,

तो आल्या आल्या तिने छानसं स्मितहास्य केलं,

त्याचं लक्षही नव्हतं,

तो घाम पुसत आत आला,

“मला कडक कॉफी कर”

****

भाग 2
भाग 3

2 thoughts on “प्रेम-1”

  1. माणसाने जमा ही ठेवावी पण छोट्या छोट्या गोष्टी पण लक्षात ठेवाव्यात की ज्यामुळे सर्वांना आनंद होईल कथा चांगली आहे

    Reply

Leave a Comment