प्रश्नार्थक चिन्ह-1

“मी स्वतःच्या जीवावर वस्तू घेते, नवऱ्याच्या जीवावर नाही”

सुनबाई असं बोलली अन मालतीच्या काळजातून एकच कळ गेली,

वयाच्या पंचावन्नव्या वर्षी तिला हे ऐकावं लागत होतं,

70-80च्या दशकातील तिचं लग्न,

हा काळ स्त्रीवर्गासाठी प्रचंड संघर्षमयी,

एकीकडे स्त्रीवादाचे वारे वाहत होते, स्त्रिया आगेकूच करत होत्या आणि दुसरीकडे जुनी पिढी आपल्या विचारांना सोडून द्यायला तयार नसायची,

त्या काळातल्या स्त्रियांना आपणही स्वप्न बघू शकतो अशी थोडी जरी आशा निर्माण झाली तरी दुसऱ्याच क्षणी भयाण वास्तव त्यांची आशा धूसर करी..

मालतीचं लग्नही त्याच काळातलं,

मालती लहानपणापासून हुशार,

पण ही हुशारी संसारात वापरायची असा आई वडिलांचा कयास,

मालतीचं लग्न झालं म्हणजे एक ओझं कमी होणार,

तरी तिने धीर करून सांगितलं,

“मला शिकू द्या बाबा, स्वतःच्या पायावर उभी राहीन..”

“तुझा बाप बागायतदार नाही तुझ्या शिक्षणावर पैसा ओतायला..”

वडील रागाने म्हटले आणि तिला पर्यायच उरला नाही,

झटपट स्थळ बघून लग्न केलं गेलं,

****

भाग 2

प्रश्नार्थक चिन्ह-2

1 thought on “प्रश्नार्थक चिन्ह-1”

Leave a Comment