प्रतिबिंब

 “तू पुन्हा तुझ्या ज्वेलरी डिजाईन चं काम का नाही सुरू करत? खूप डिमांड असायची तुला..एकदम का बंद केलंस?”

“काही नाही गं, आधी सासूबाईंनी मदत व्हायची, आता वयानुरूप त्यांनाही जमत नाही मदत करायला, त्यात मागे एकदा बाथरूम मध्ये पडल्या त्या, आता बेडवरच आहेत..”

“अच्छा म्हणून सोडलं काय तू सगळं…बाईने कितीही ठरवलं काही करायचं तरी काही ना काही मागे लागतच बघ तिच्या..”

प्रज्ञाची मैत्रीण तिला बोलून गेली खरं पण बेडमध्ये असलेल्या सासुबाईंच्या कानावर ते पडलं. ती मैत्रीण निघून गेली तसं प्रज्ञा ने सुस्कारा टाकला आणि छानपैकी जेवणाचं ताट घेऊन tv बघत बसली. 

संध्या एक ज्वेलरी डिझाइनर. पण काहीतरी करून दाखवावं, आपल्या कौशल्याचा उपयोग करून घ्यावा असं फारसं तिला वाटत नसे, ती मुळातच आळशी स्वभावाची. दिवसभर आराम करायला मिळतोय ना, मग कशाला चार काम ओढवून घ्यायची? मैत्रिणीला सासूबाईंचं कारण पुढे करून तिने टाळलं. बेड मधून काहीतरी पडण्याचा आवाज आला तशी ती सासूबाईंकडे धावली, त्या पाणी घ्यायला उठत होत्या. 

“आई पाय बरा झालेला नाहीये अजून, मला हाक द्यायची ना..”

सासूबाई काहीही बोलल्या नाहीत. तिने पाण्याचा पेला भरून जवळ ठेवला आणि सासूबाईंना बजावून सांगितलं की काहीही लागलं की हाक मारा. थोड्या वेळाने पुन्हा आवाज, प्रज्ञा परत त्या दिशेने धावली अन पाहते तर काय, सासूबाई उभं राहण्याच्या प्रयत्नात खाली पडल्या, “आई का आगाऊपणा करतात तुम्ही? पाय बरा झाला की मॅरेथॉन ला जा वाटल्यास, पण निदान आता तरी आराम करा..”

सासूबाईंना दम देऊन ती बाहेर आली, आता तिला वैताग येऊ लागलेला. निमूटपणे आराम करायचं सोडून सासूबाई कशाला आगाऊपणा करताय तिला समजत नव्हतं.

संध्याकाळी डॉक्टर चेकअप साठी आले, पायात सुधारणा आहे असं सांगून काही औषधं दिली.

“डॉक्टर, मला कधीपासून चालता येईल पहिल्याप्रमाणे?”

“तुम्ही आराम केला की मगच..”

डॉक्टर एवढं सांगून निघून गेले. प्रज्ञा आशिषला सासूबाईंसमोरच सांगू लागली, 

“आई अजिबात ऐकत नाहीत, आराम करायचा सोडून इकडे तिकडे चालायला बघतात, सकाळी पडल्या होत्या, सुदैवाने काही दुखापत झाली नाही तेवढं नशीब..”

“सुनबाई जरा बाहेर जातेस का, मला आशिष सोबत काहीतरी बोलायचं आहे..”

प्रज्ञाला प्रश्न पडला, सासूबाईंना काय सांगायचं असेल? माझी तक्रार तर करणार नाहीत ना त्या? तिने बाहेर जायचं नाटक केलं पण दरवाजाआड लपून ऐकू लागली. सासूबाई त्यांच्या मुलाला सांगत होत्या..

“अरे प्रज्ञाला माझ्यामुळे अडकून राहावं लागतंय याचं खूप वाईट वाटतंय मला, माझं आयुष्य तर गेलं सर्वांचं करण्यात पण माझ्या सुनेच्या वाट्याला तरी ते येऊ नये म्हणून प्रयत्न करतेय स्वावलंबी बनण्याचा. तिला ज्वेलरी डिजाईन करायची इच्छा आहे पण माझ्यामुळे बिचारीला वेळ कुठे मिळतोय, म्हणून म्हटलं जरा स्वतःची कामं स्वतः शिकून घेऊ म्हणजे सूनबाईला तिचा वेळ मिळेल..”

हे ऐकून प्रज्ञाला धक्काच बसला, सासूबाईंनी धडपड तिला समजली. आपण काय विचार करत बसलो याचा तिलाच राग येऊ लागला. आता तिच्यासाठी नाही पण सासुबाईंसाठी तिने पुन्हा ज्वेलरी डिजाईन कडे मोर्चा वळवला..सासूबाई आपल्या सुनेत आपलं प्रतिबिंब बघत होत्या, आपल्याला जे करता आलं नाही ते आपल्या सुनेने करावं या त्यांच्या इच्छेला न्याय देण्यासाठी तिने पुन्हा एकदा आळस झटकून ज्वेलरी डिजाईन करायला घेतली. बघता बघता बिझनेस वाढला आणि प्रज्ञाचा आळसही कुठल्या कुठे पळाला..त्यातून आलेल्या पैशाहून सासूबाईंच्या चेहऱ्यावर दिसत असलेलं समाधान खूप जास्त किमती होतं..

माझ्या इतर कथा 👇👇👇

 दोन वर्षाच्या सियाने खोलीत जाऊन दरवाजा बंद केला अन latch lock केलं तसं घरातले सर्वजण घाबरून दरवाजाकडे पळाले. तिने नुसतं latch ओढलं नव्हतं तर खालून लॉक सुद्धा केलेलं. पण तिला आता ते काही उघडता येईना त्यामुळे ती जोरजोराने रडायला लागली. बाहेरून आजी, आजोबा आणि शशांक ओरडू लागले, आपापसात मोठ्याने गोंधळ घालू लागले.

“तरी मी सांगत होते की किल्ल्या जपून ठेवा म्हणून, आता एवढीशी ती किल्ली घरात कुठे सापडणार?”

“तू शोध तर खरं आई, तोवर मी किल्ली वाल्याला घेऊन येतो..”

“अरे किती रडतेय ती आतून, रडून रडून ताप काढून घेईल..”

पूर्ण वाचा

______________

 रेवतीबाईंना मनासारखी सून मिळाली नाही म्हणून त्यांची सर्व आशा आता धाकट्या सुनेकडून होती. कार्तिकी एक डॉक्टर, प्रॅक्टिससाठी ती ओळखीतल्याच एका डॉक्टरकडे जात असे. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 अशी तिची वेळ. सासरी कामाची बोंबच होती. सासूबाईं एकट्या कशाबशा घर आवरत. त्यांच्या एका लाडक्या भाचीचं फार्मसी मध्ये शिक्षण झालेलं, अर्थात तिने फक्त लग्नाच्या बायोडेटा वर उठून दिसावं म्हणूनच शिक्षण केलेलं. बाकी तिला करियर वगैरेत आवड नव्हती. आपली भाचीही औषधं देऊ शकते, म्हणजे तीही कार्तिकीच्या तोलामोलाचीच असं त्या अशिक्षित रेवतीबाईंना वाटे

पूर्ण वाचा

__________

दिशाची रोजच धांदल उडत असे. लग्न करून आली अन समोर नोकरी अन घर सांभाळणं दोन्ही जबाबदाऱ्या तिने हसत हसत अंगावर घेतल्या. सासूबाईंनी सून आली म्हणून एकेका जबाबदारी मधून अंग काढून घेतलं. आणि आता त्याची इतकी सवय झालेली की एखादं काम करायची वेळ आली ली त्यांना प्रचंड जीवावर यायचं. 

“माझ्याकडून आता कामच होत नाही बाई..”

हे त्यांचं वाक्य सतत कानी यायचं. दिशाला ते पटायचं

पुढे वाचा
____

मुलांसाठी शाळा निवडताय? आधी ही सत्य जाणून घ्या

https://www.irablogging.in/2021/06/blog-post_33.html?m=1

_________

समूहात वावरताना

https://www.irablogging.in/2021/06/blog-post_23.html?m=1

Leave a Comment