पावभाजी-2

आपला नवरा आपला सोडून सर्वांचा आहे याची तिला जाणीव झाली..

वर बायकोनेही यात सामील व्हावं ही अपेक्षा..

पण तिलाही स्पेस हवी होती..

नवऱ्याचा वेळ तिलाही हवा असायचा..

तिने अप्रत्यक्षपणे सांगायचा प्रयत्न केला..

पण त्याला कळेना..

शेवटी तिने ठरवलं..

सरळ माहेरी जायचं..

नेहमी जाते तशी..

पण लवकर यायचं नाही..

जोपर्यंत आपली किंमत कळत नाही तोपर्यंत..

तिच्या नणंदबाईच्या मुलाचा वाढदिवस होता..

नवरा सकाळपासून कार्यक्रमाच्या तयारीत..

फुगे आण,

हॉल सजव..

तीही गेलेली,

सगळं करत होती,

पण तिने ठरवलं होतं,

कार्यक्रम झाला की इथून तडक घरी जायचं,

बॅग गाडीत ठेवली होती,

नवऱ्याला सांगायला त्याला कुठे वेळ,

कार्यक्रम झाला की सांगू..

माहेरी मात्र आईला फोन करून दिला,

कार्यक्रम झाला की सरळ घरी येईन..

“काय गं काही झालंय का?”

“माहेरी येते म्हणजे काही व्हायलाच हवं का? सहज नाही का येऊ शकत?”

कुणालाही त्रास न होऊ देता तिने शांतपणे हा निर्णय घेतला..

कार्यक्रम सुरू होता,

बच्चेमंडळी उड्या मारत होती,

मोठ्ठा केक आणलेला,

सगळे जमून गप्पा मारत होते,

तिचा नवरा मात्र नुसती धावपळ करत होता,

इकडून तिकडे तिकडून इकडे,

***

भाग 3

1 thought on “पावभाजी-2”

Leave a Comment