पाच पदार्थ-2

“तुझं बरोबर आहे, समजवेन मी तिला..”

वडिलांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला,

पण तिचा स्वभाव, बदलायला काही तयार नव्हता..

ती मोठी झाली, यशस्वी झाली पण मनात सतत चलबिचल सुरू असायची,

जे मिळालं नाही ते मिळवण्यासाठी धडपड करायची, मग त्या नादात आयुष्याचा आनंद बाजूला राहायचा…

तिचं लग्न झालं,

तिच्या पसंतीच्या एका मोठ्या श्रीमंत मुलाशी लग्न झालं,

तो श्रीमंत असला तरी मनाने सरळ, शांत होता..

हळूहळू त्यालाही तिच्या या स्वभावाचा अंदाज येऊ लागला,

त्याने सहज बोलता बोलता फोनवर तिच्या आईकडे हा विषय काढला,

आई म्हणाली,

“तिच्या या स्वभावाचा तुम्हाला त्रास तर होत नाही ना? आम्ही खूप समजवायचो तिला पण..”

“आई त्रास असं नाही, पण हेच बघा ना..आमच्याकडे पैशाची काही कमी नाही हे तुम्हाला माहीतच आहे..गावाकडे बंगला आहे, शेती आहे…इथे दोन फ्लॅट, तीन गाळे आहेत आणि त्यात मला चांगला पगार आहे..पण हिच्या अपेक्षा संपतच नाहीत..फ्लॅट झाला पण बंगला कुठेय, बंगला असला तरी प्लॉट नाही, स्वतःचा बिझनेस नाही…असं एकेक कुरबुरी चालूच असतात..आणि समजा तेही केलं तरी उद्या नवीन काहीतरी नाही म्हणून ते पूर्ण करण्यामागे हिचा धडाका..”

“माफ करा जावईबापू, पूजामुळे तुम्हाला इतका त्रास..”

“अहो नाही नाही, मी तक्रार करत नाहीये तिची…पण हा स्वभाव चांगला नाही हेही खरं…काळजी करू नका…मी बघतो..”

नवऱ्याने खूप विचार केला आणि एक शक्कल लढवली,

त्याने पूजाला सांगितलं..

“तुला प्लॉट घ्यायचा आहे ना? मग माझी एक अट पूर्ण कर..”

“कोणती अट?”

“इथून पुढे 3 दिवस तू मला माझ्या आवडीचे 5 पदार्थ खाऊ घालायचे, आणि चौथ्या दिवशी मी तुला पाच पदार्थ खाऊ घालेन..”

“हा काय बालिशपणा आहे?”

“मी सांगतो म्हणून, बघ..ऐकलं तर तुझ्या मनासारखं होईल..”

“ठीक आहे..”

असं म्हणत पूजा रोज त्याच्या ताटात त्याच्या आवडीचे 5 पदार्थ देई..

पहिल्या दिवशी खीर, पुरी, वरण, भात आणि कोशिंबीर वाढली,

*****

भाग 3
https://irablogging.in/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5-3/

2 thoughts on “पाच पदार्थ-2”

Leave a Comment