पलीकडलं रूप-3

 “तू थांब.. मी काहीतरी करते..”

रचनाला पुन्हा गप केलं, रचना आता शांत बसली..

रचनाच्या सासूने “आता मलाच काहीतरी करावं लागेल” या आविर्भावाने ताठ झाल्या..

त्यांनी एकेकाला फोन लावला, 

“अहो लग्नाचा लेहेंगा कुरतडला गेलाय, काही करता येईल का?”

“मला तर नाही जमणार, पण एका मोठ्या टेलर चा नंबर आहे तो देतो..”

सासूने त्या नंबरला फोन केला,

“नाही ते आम्हालाही नाही जमणार, मी एका दुसऱ्या डिझाईनर चा नंबर देतो..”

असं करत चार पाच नंबर फिरवले गेले,

अखेर एकाने सांगितलं, या नंबर वर फोन करा..तुमचं काम 100% होणार,

सासूबाईंनी मोठ्या मिजाशीत तो नंबर फिरवला,

रचनाला तो लागला,

“तुला कसकाय लागला फोन? चुकुन लागला वाटतं..”

त्यांनी पुन्हा फोन फिरवला,

“अरे देवा, रचनाला का फोन लागतोय? फोन बिघडलाय की काय?”

सासूबाईंनी त्या माणसाला परत फोन केला,

“अहो नंबर बरोबर दिलाय का? सारखा दुसरीकडे लागतोय..”

“नाही ओ.. नंबर अगदी बरोबर आहे…रचना मॅडम चा नंबर आहे तो, आपल्या शहरातल्या मोठ्या फॅशन डिझाइनर…”

सासुबाई डोळे मोठे करत ऐकू लागल्या,

रचनाला समजलं, ती फक्त हसली आणि नवरीच्या खोलीकडे गेली,

तिने नवरीचा लेहेंगा घेतला,

खाली अस्तराचा एक भाग कापून घेतला,

जेवढा भाग कुरतडला गेलाय तिथे अस्तराचा भाग छानपैकी कापून जोडून दिला,

अजून बऱ्याच खटाटोपी करून लेहेंगा आधीपेक्षा सुंदर बनवून दिला..

नवरी जाम खुश झाली,रचनाला मिठी मारली..

सासूबाईला सगळे म्हणू लागले,

तुमची सून फार हुशार आहे हो..!

होतीच ती हुशार, म्हणूनच शहरात मोठं बुटीक चालवत होती..

मोठमोठे मॉडेल्स तिच्याकडून कपडे बनवून घेत,

लग्नासाठी तिची तिकडची कामं खोळंबली होती,

पण आपला मान, सन्मान, पैसा, स्थान सगळं बाजूला ठेऊन ती सासरी वावरत होती,

मुली अश्याच असतात,

आपलं स्थान, आपली हुशारी नात्यांसाठी बाजूला ठेवतात,

सासूबाईंनी तिला फक्त सून म्हणून पाहिलं होतं,

पण त्या स्त्री मागे दडलेलं कर्तृत्व ज्याला ओळखता आलं,

सुने पलीकडचं असलेलं तिचं स्थान लक्षात आलं..

तर ती सून खऱ्या अर्थाने भाग्यवान समजायची..

समाप्त

8 thoughts on “पलीकडलं रूप-3”

  1. अशा किती तरी रचना आहेत त्याच्या कलेकड कुणी पहातच नाही

    Reply
  2. कथा छान आहे दूरदैवाणे आपल्या कडे अशा खूप सुना आहेत ज्यांची हूशारी व कला मातीमोल होतें

    Reply
  3. खूपच छान कथा असतात तुमच्या आवडतात मला, मस्तच.

    Reply
  4. उत्तम कथा डोळ्यात अंजन घालणारी तरी माणसं बदलत नाही असा अनुभव आहे

    Reply

Leave a Comment