परफेक्शन-3

 दोन दिवस मस्त रमल्या बहिणी,

पण बहिणीचा व्याप भारी,

शिवणकाम, क्लास, घर, मुलं..

त्यात अर्धी कामं आता तिच्यावर पडली,

बहीण म्हणायची,

आराम कर,

पण बहिणीवर ओझं बनायला तिलाच नको वाटायचं,

सासरी कामातून मुक्तता म्हणून ती गेली,

पण आगीतून फुफाट्यात असं तिचं झालं..

तिला मोठ्या जावेची आठवण झाली,

घरात कसलंच काम नाही,

सगळ्याला बायका,

जाऊ प्रचंड आळशी,

पण मनाने गोड,

मोठी बहिणच जणू,

ही तिच्याकडे गेली,

आरामशीर उठा, 

खा, प्या अन झोपा…

एक दिवस बरा गेला,

पण जाऊ प्रचंड बडबडी,

सासर, माहेर, मैत्रिणी, सोसायटी..

सगळ्या गमती सांगायची,

जणू पृथ्वीवर गप्पा मारायला तिला पहिल्यांदा कुणीतरी भेटलेलं..

हिचं शरीर आराम करत होतं पण मेंदू थकायला लागला,

बडबड, बडबड…नुसती बडबड..

हिचं डोकं पिकलं..

गेली परत सासरी,

जाताच पाहुण्यांचा पूर आलेला..

स्वयंपाक, झाकपाक.. पुन्हा सुरू झालं..

तिला वाटू लागलं,

मेलं आराम काय असतो? कुठे जावं? 

स्वतःशीच हसली,

तिला समजलं,

परफेक्ट जागा,

परफेक्ट माणसं,

परफेक्ट जीवन..

अस्तित्वात नसतंच..

आहे त्यात आनंद शोधायचा असतो,

उणिवेला जागा नसेल तर..

आनंदाला काय किंमत?

समाप्त

11 thoughts on “परफेक्शन-3”

Leave a Comment