परतफेड-2

“तुझ्या घरून शिदोरी आली, त्यात किती हलक्या वस्तू होत्या? आम्ही काय इतके गरीब वाटलो काय? धान्य दिलं ते बघण्यालायक सुद्धा नाही, साखर दिली तशी साखर आमची कामवाली सुद्धा वापरत नाही..”

हे ऐकून तिला धक्काच बसला,

शिदोरी म्हणजे काय अन ती द्यावी लागते हेही ज्या मुलाला माहीत नव्हतं तो त्याबद्दल इतकं बोलतोय?

शिदोरी दिली जाते हे कधी माहीत पडलं तुम्हाला?

माहितीये मला, आम्हीही दिलेली पण असल्या हलक्या वस्तू नाही दिल्या कधी,

वा !

ती एवढंच बोलली, आणि कूस बदलून झोपी गेली..

तिला समजलं होतं,

तासभर उशिरा यायचं कारण,

तिच्या अनुपस्थितीत तिच्याबद्दल बरंच काही बोललं जायचं..

लग्नात तिच्या घरच्यांनी कार्यात केलेल्या चूका अन जेवणातले मेनू,

याबद्दल चर्चा झालेली,

आणि हे ऐकून त्याच्याही मनात विष पेरलं जात होतं..

जोवर लग्नाच्या या पद्धती अन देवाणघेवाण नव्हती तोवर दोघांमध्ये सगळं ठीक होतं,

पण या गोष्टी होऊ लागल्या तसतशी कटुता निर्माण होऊ लागली,

तुम्ही हे नाही केलं,

तुम्ही ते नाही केलं,

अशीच साडी दिली,

तश्याच वस्तू दिल्या..

दोघांचं नातं दिवसेंदिवस खराब होत चाललेलं..

***

भाग 3
https://irablogging.in/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%a1-3/

1 thought on “परतफेड-2”

Leave a Comment