परतफेड-1

दोघांचं नुकतंच लग्न झालेलं..

रात्री सगळी कामं आवरून ती खोलीत येऊन बसली,

नवऱ्याची वाट बघत,

पण तो बाहेरच होता,

बराच वेळ..

घरच्यांशी काहीतरी बोलत होता,

तासाभराने तो खोलीत आला,

पण नेहमीप्रमाणे त्याचं वागणं नव्हतं,

त्याच्या डोक्यात राग भरलेला दिसत होता,

बोलण्याच्या मनस्थितीत तो दिसत नव्हता,

ती जराशी घाबरली,

हळूच विचारलं,

काय झालं?

काही नाही..

या काही नाही मध्ये बरंच काही होतं हे ती जाणून होती,

जाणून घेतल्याशिवाय तिला राहवत नव्हतं,

जे असेल तर स्पष्ट बोला..

***

भाग 2
https://irablogging.in/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%a1-2/

भाग 3
https://irablogging.in/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%a1-3/

Leave a Comment