पन्नास रुपये-3

 दोघे संसार करत होते,

छानपैकी सुरू होतं..

मंदी आली तसा पगार कमी झाला,

घरखर्च जेमतेम भागू लागला,

महिनाअखेर होता,

गाण्याच्या खिशात फक्त पन्नास रुपये होते,

पगाराचा अजून पाच दिवस बाकी,

पाच दिवस या पन्नास रुपयात काढायचे होते,

तिसऱ्या दिवशी गावाकडून आई आली,

रमेने यथेच्छ स्वागत केलं,

गणू कामावरून घरी आला,

आईला बघून खुश झाला,

रमेने ऑर्डर दिली,

बाजारात जा आणि रवा, साखर, तूप आणि आईंसाठी छान मिठाई घेऊन या,

गण्या बुचकळ्यात पडला,

खिशात पन्नास रुपये,

आणि यादी एवढी मोठी,

आईने त्याच्याकडे पाहिलं,

असाच चाललास? कपडे किती मळलेत, दुसरे घाल बघू..

रमे आन गं,

जाऊदे तू कामात आहेस, मीच देते,

आईने नवीन सदरा आणून दिला,

गण्याने ती घातला आणि बाजारात गेला,

दुकानात सामानाची यादी दिली,

पन्नास रुपये हातात टेकवून बाकीची उधारी ठेऊ असा विचार त्याने केला..

त्याने सामान घेतलं,

पन्नास रुपये काढायला खिशात हात घातला,

खिशाला जास्त नोटा लागल्या..

त्याने पटकन खिशातलं सगळं बाहेर काढलं,

त्यात हजार रुपये होते,

कुठून आले? कधी आले? केव्हा आले?

प्रश्न सुरू असतानाच दुकानदाराने बिल दिले,

गण्याने ते पैसे चुकते केले,

घरी जाता जाता त्याला समजलं,

आईने सदरा का बदलायला लावलेला…

शेवटी आईच ती..

खिशातले पन्नास रुपये सुद्धा तिने त्याच्या डोळ्यातून वाचले होते…

समाप्त

1 thought on “पन्नास रुपये-3”

  1. छान. मुलाचंच काय, ज्यांच्या विषयी प्रेम असतं, त्यांचं मन बायकांना कळतंच, मग नवरा, मुलं, भावंडे, मित्र मैत्रिणी,कोणीही असो.

    Reply

Leave a Comment