निष्प्राण -2

“बस..ठरलं म्हणजे ठरलं..अर्धा भाग विकला पण अर्धा आहे ना? आणि जितू एकदा चांगलं शिकून नोकरीला लागला तर अश्या दहा जमिनी घेईल आपल्याला..”

पैशांची सोय झाली, ऍडमिशन साठी बाबा आणि जितू शहरात जाणार होते..आई म्हणाली,

“मनूला पण घेऊन जा, तिथे एखाद्या चांगल्या दवाखान्यात दाखवा…फरक पडेल..”

मनू सुदधा आता त्यांच्यासोबत जाणार असं ठरलं..

जाण्याच्या आदल्या रात्री आई जीतूच्या वडिलांना सांगत होती..

“मनुच्या लग्नाचं काय करायचं?”

“तिचं असं दुखणं बघून कोण तयार होतंय लग्नाला? मुलगी सतत आजारी असते म्हणून कुणीही तयार होत नाही..”

“मग आयुष्यभर अशीच राहणार का ती?”

वडील शांत झाले, त्यांच्या डोक्यात एक योजना होती, पण वेळ आल्यावर ते बोलणार होते..

तिकडे मनूचं डोकं आज जास्तच दुखायला लागलेलं..ती कण्हत होती…वेदना असह्य होत होत्या..

रात्री उठून तिने चूल पेटवली आणि कपड्याचा बोळा करून चुलीवर धरत डोकं शेकू लागली..

दुसऱ्या दिवशी,

जितू, मनू आणि त्यांचे वडील निघाले शहराकडे.

जाता जाता आधी दवाखान्यात जायचं होतं..

तिथे रिपोर्ट काढले, नंबर लावून बसले..

बाबांनी दोघांना बाहेर थांबायला लावलं..ते एकटे आत गेले..

“डॉ म्हणाले, इतके दिवस का चेक केलं नाही?”

“काय झालं डॉक्टर?”

“मेंदूत गाठ आहे तिच्या , वाढत चाललीये…अशीच वाढत राहिली तर…”

“काय करावं लागेल?”

“ऑपरेशन ने ठीक होईल..”

“किती येईल खर्च?”

“दहा लाख…”

वडिलांचे डोळे विस्फारले गेले, त्यांनी खिसा दाबून ठेवला अन बाहेर निघाले..”

मनु आणि जितू मागोमाग गेले..

“काय झालं बाबा? काय म्हणाले डॉक्टर?”

“काही नाही.. काही दिवसांनी आपोआप बरं होईल म्हणे..”

तिघेही पुढे कॉलेजला गेले, जितू चं ऍडमिशन, हॉस्टेल ची सोय करून परत आले..

आल्यावर आईने विचारलं..

“मनु चं काय सांगितलं?”

बाबा मौन राहिले, मनु म्हणाली…

“अगं काही नाही, काही दिवसांनी आपोआप बरं होईल म्हणे..”

असं सांगत ती तिच्या खाटेकडे झोपायला गेली, चादर ओढून हमसून हमसून रडायला लागली…

डॉक्टर आणि वडिलांचं बोलणं तिने ऐकलं होतं..

पण आपण ते ऐकलं नाही हे दाखवण्यातच तिने योग्यता मानली..

जितू शहरात गेला..

गावात एक 45 वर्षाचा माणूस राहत होता, बायको काही वर्षांपूर्वीच सोडून गेलेली..पदरात 2 मुलं.. तेही आजीकडे राहत..

वडिलांनी घरी जाहीर केलं..

मनुला त्याच्या घरात द्यायचं..

क्रमशः
भाग 3

3 thoughts on “निष्प्राण -2”

Leave a Comment