मनू…अगं पळ लवकर, जितू पास झालाय बारावी, 70 टक्के मिळालेत त्याला..”
मनू ने घराकडून आलेली हाक ऐकली आणि शेतातले काम सोडून घरी पळाली..
तिचा लहान भाऊ जितू, यंदा बारावीला होता..
हुशार होता…बारावीला शाळेत पहिला आला अन घरी आनंदी आनंद…
आईने देवापुढे साखर ठेवली, बाप छाती काढून मिरवत होता..
मनुला तर भावाला कुठे ठेऊ अन कुठे नको असं झालेलं…
आनंद साजरा करून झाला, सगळे येऊन भेटून गेले..
संध्याकाळी विषय निघाला, पुढे काय?
जितूने हळूच सांगितलं..
पुढच्या शिक्षणाला शहरात जावं लागेल,
घरात मोठा पेच उभा राहिला..
शेती करून घर चालत होतं, जेमतेम पैसा होता..
पुढचा खर्च कसा परवडणार?
मनूचं पुन्हा एकदा डोकं दुखू लागलं आणि ती आत गेली..
मनुला हे नेहमीच व्हायचं, अचानक मधेच डोकं दुखायचं.. अगदी असह्य व्हायचं, गावचे डॉक्टर झाले, तात्पुरता फरक दिसायचा, पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या..
आत जाऊन तिने पडून घेतलं..
बाहेर सर्वजण मौन होते, रोज रडे त्याला कोण रडे म्हणून मनु कडे कुणाचं लक्ष नव्हतं, पण जितूचा प्रश्न समोर येऊन ठेवलेला.
आई म्हणाली,
“जित्या, बस एवढं शिक्षण आता..शेतीतच लक्ष घाल..आपल्याकडे इतका पैसा असता तर मनुला चांगल्या डॉक्टर कडे नेलं असतं… तिच्यासाठी पैसा नाही, तुला कुठून आणणार, काय हो?”
आईने एकदा जीतूच्या बाबांकडे पाहिलं, ते काहीच बोलले नाही..जेवण करून हात धुवून समोर आले, म्हणाले..
“जितू जाणार शिक्षणाला…मी पाहीन पैशाचं..”
दुसऱ्या दिवशी काही माणसं आली, जमिनीचा व्यवहार करायला..
आईला समजलं, मनु पण दाराआडून बघत होती..
माणसं गेली, आई पुढे आली..
“अर्धी जमीन विकताय तुम्ही? अहो..”
क्रमशः
भाग 2
भाग 3
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article. https://accounts.binance.com/ka-GE/register?ref=PORL8W0Z