निखारा- एक थरारक कथा (भाग 1)

तिने प्रवेश केला तसा अड्ड्यावरची सर्व माणसं आपापल्या बंदुका खाली टाकून उभी राहिली…ती चालत होती, तिच्या सोबत दोन माणसं तिचे अंगरक्षक म्हणून तिच्या सोबत चालत होते…चालतांना तिची नजर अड्ड्यावरच्या कानाकोपऱ्यात भिरभिरत होती…ज्याचाकडे तिची नजर जाई तो खाली मान घालत होता..

तिचा दाराराच होता असा…अब्दुल च्या मृत्यू नंतर जिहाद संघटनेची ती प्रमुख बनली होती. अब्दुल ने तसं मृत्युपत्रात लिहिलंच होतं… त्यामुळे अब्दुल चं ऐकणं सर्वांना भाग होतं…
रमजान च्या यात्रेत अब्दुल आणि शबाना ची ओळख झाली होती, अब्दुल तिच्या प्रेमात वेडा झाला होता…तिच्याशी लग्न तर केलं, पण सहा महिन्यात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला…अब्दुल ला attack आलेला असं शबाना सांगायची…पण खरं काय होतं ते कुणालाच समजलं नाही…
नासिर ला मात्र शबाना वर कायम संशय यायचा..हिला नक्की काय हवंय? जिहाद साठी लढतेय का ही? की हिला दुसरं काही हवंय? त्याने इतरांनाही आपला संशय व्यक्त केला..पण एकही जण ऐकायला तयार नव्हता…

ती प्रमुख झाल्यानंतर पहिल्यांदाच एक हल्ला करायचा ठरला होता..शबाना सर्व प्लॅनिंग करत होती…
‘जिहाद’…पाकव्याप्त काश्मीर मधील एक दहशतवादी टोळी…नवीन तरुणांना घेऊन ही टोळी नव्याने बांधली जात होती..भारतात अनेक हल्ले या टोळीने घडवून आणले होते…आणि आता या टोळीने नवनवीन धोरणं आखली होती…अब्दुल ने वर्षभरात टोळीला भडकावून नवनवीन तरुण तयार केले होते…पण अचानक त्याच्या आयुष्यात शबाना आली आणि सर्वकाही बदलून गेलं…
अब्दुल नंतर शबाना ने पुढील हल्ल्याचा कट रचला होता…या कटासाठी लागणारी हत्यारं निवडायला त्यांची गाडी निघाली…गाडीत शबाना, नासिर, कबीर आणि मुहम्मद निघालेले…जातांना एक हिंदू वस्ती लागली, जिथे एक छोटंसं मंदिर होतं… शबाना ने नकळत हात डोक्याकडे नेला…नासिर चं आपल्याकडे लक्ष आहे हे कळताच तिने बुरखा नीट करण्याचं नाटक केलं…

नासिर चा संशय पुन्हा दाट झाला…
थोड्याच वेळात सर्वजण त्या ठिकाणी पोचले…हत्यारं निवडली गेली…लहान बंदुका, काडतुसे, बॉम्ब…बऱ्याच वस्तू निवडल्या गेल्या..आणि सर्व सामान घेऊन ते गाडीत बसले..


क्रमशः

पुढील भाग
part 2
part 3
part 4
part 5
part 6
part 7

Leave a Comment