नशिबाची थट्टा-3

 रेखाताईंनी मन लावून ऐकलं,

आता कानाला खडा,

धाकल्या मुलाला त्याच्या पसंतीची मुलगी शोधायला लावायची, आणि तीही शहरातली…नोकरी वाली,

लहान मुलगा कामाला लागला,

त्याला कसली आली गर्लफ्रेंड,

कुत्रं विचारत नव्हतं,

पण आता आईने परवानगी दिली म्हटल्यावर भेटेल त्या मुलीशी ओळख करून घेऊ लागला,

एक मुलगी कशीबशी पटली,

नोकरी करत होती,

लग्न झाल्यानंतर ती घरात आली, रेखाताईंनी सुटकेचा निःश्वास सोडला,

“आता सुनेवर सगळं सोपवून मी मोकळी”

घड्याळाकडे पाहिलं, 9 वाजून गेलेले,

किचनमध्ये अजूनही काही आवाज ऐकू येत नव्हता,

त्या पाहायला आल्या,

सुनबाई अजून उठली नव्हती..

“लग्नाची दगदग.. असो, उद्यापासून उठेल लवकर”

स्वतःची समजूत घालत त्या कामाला लागल्या,

दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही तेच,

चौथ्या दिवशी सुनबाई मस्तपैकी तयार होऊन किचनमध्ये आली,

“आई मला निघायचं आहे, डबा तयार आहे का?”

रेखाताई आता चक्कर येऊन पडायच्याच बाकी होत्या..

यातून दोन तात्पर्य:

अमुक एक म्हणून चांगलं, तमुक एक वाईट..असं काहीही नसतं..

आणि दुसरं महत्वाचं तात्पर्य म्हणजे,

नशीबच गांडू तो क्या करेगा पांडू 😅😅😅

3 thoughts on “नशिबाची थट्टा-3”

Leave a Comment