नशिबाची थट्टा-1

रेखाताईंनी मुलांच्या लग्नाचा धसकाच घेतला होता,

आजूबाजूला प्रेमविवाह, घटस्फोट अशी इतकी प्रकरणं ऐकू येत होती की रेखाताई दिवसेंदिवस काळजी करत होत्या,

एकदा रेखाताईंच्या चुलतबहिणीने बोलावलं म्हणून जोडीने आपल्या नवऱ्याला घेऊन त्या तिथे गेल्या,

त्यांची चुलतबहीण, त्यांच्याहुन 6-7 वर्षांनी मोठी असावी,

त्यांच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं,

रेखाताई नव्या सूनबाईकडे निरखून बघत होत्या,

तिचं वागणं, बोलणं..

अत्यंत सालस, मनमिळावू स्वभावाचा त्यांना प्रत्यंतर आला,

चुलतबहीण नशीबवान म्हणायची, त्यांनी मनातल्या मनात म्हटले,

हळूहळू माहिती कळाली,

हे स्थळ गावाहून आलेलं,

गावाकडच्या मुली म्हणजे नम्र, कष्टाळू असा समज असल्याने चुलतबहिणीने लगेच होकार दिला,

लग्न झालं आणि अगदी सुरळीतपणे संसार सुरू झाला,

बहिणीची सून, नजर खाली घालुन, डोक्यावरचा पदर नीट करत पायाला भिंगरी लावल्यासारखी काम करताना दिसत होती,

रेखाताईंनी मनोमन ठरवलं

“केली तर गावाकडचीच सून करणार…अरेंज मॅरेज, मुलाने कुणी पसंत केलेली चालणार नाही..”

ठरलं,

गावाकडच्या मुली बघणं सुरू झाल्या,

भाग 2

नशिबाची थट्टा-2

भाग 3

नशिबाची थट्टा-3

Leave a Comment