धुरा (भाग 8 अंतिम) ©संजना इंगळे

तेजु सर्व व्यवस्था बदलून टाकते…अगदी शिक्षणापासून ते राजकारणापर्यंत…सुरवातीला बदलाला सामोरं जायला सर्वांनाच थोडा त्रास होतो, पण हळूहळू जनतेला हे समजतं की हा बदल स्वीकारला तरच आपला विकास शक्य आहे.

तेजु ने दिवसरात्र एक करून राज्याचा नकाशाच बदलला…

राजकारण शुद्ध झालं, शिक्षणव्यवस्थेने जगातील पातळीवर गाजणारे व्यक्तिमत्त्व घडले, भ्रष्टाचार करणारा आता चळचळ कापू लागला..गुन्हे कमी झाले, बेरोजगारी कमी झाली, राज्यात कुणीही उपाशी झोपणार नाही अशी तरतूद केली गेली…

मुख्यमंत्री काळ आता संपत आलेला…देशात सर्व क्षेत्रात आता महाराष्ट्र अग्रेसर होता…

तेजु काम करून इतकी थकली होती की 1 दिवस आराम म्हणून घरी गेली…बाबांच्या ऑफिस मध्ये खूप वेळ घालवला..

“बाबा…तुमचं साम्राज्य मी व्यर्थ जाऊ दिलं नाही…आज तुम्ही पाहिजे होता…हे साम्राज्य पाहायला हवे होता..”

नंतर तेजु काही वेळ आईच्या मांडीवर डोकं ठेऊन पडली..

“बेटा.. दमलीस का गं?”

“खूप दमलीये आई…खूप….पण तुझ्या कुशीत आता सगळा शीण निघून गेला बघ…”

तेजुचे डोळे लागत नाही तोच तिचा फोन वाजतो..

“मॅम…ताबडतोब ऑफिस ला या..”

“काय झालं?”

“गोष्ट गंभीर आहे…आल्यावर सांगतो..”

तेजु तशीच उठली आणि ड्रायव्हर ला गाडी काढायला सांगितली…

ऑफिस मध्ये पोचताच..

“काय झालं?”

“मॅम…खुप वाईट प्रसंग घडलाय..”

“काय झालं महाजन नेमकं सांगाल का?”

“आंबेवाडी गावात…एका मुलीवर….”

“काय? पोलीस झोपले होते का?”

“मॅम, सुनसान जागा होती…7 लोकं होती…”

“मला फिल्ड चे फोटो दाखवा..”

फोटो बघून तेजुचे डोळे संतापाने लाल होतात…

“आरोपी कुठेय??”

“पकडला आहे त्याला…आंबेवाडी च्या पोलिसात सातही जण कैद झालेत..”

“गाडी काढा…”

“कुठे?”

“आंबेवाडी..”

“मॅम??”

“गाडी काढा…”

तेजु ड्रॉवर मधून एक वस्तू घेते आणि आंबेवाडी ला प्रस्थान करते…

तिकडच्या पोलीस स्टेशन ला जाताच..

“इथले cctv बंद करा.”

“काय?”

“सांगितलेलं कळत नाही का…बंद करा..आणि आरोपींचे हात बांधून समोर आणा…”

सातही आरोपींना हात बांधून समोर आणलं जातं..

तेजु त्यांचा समोर जाते…

“हे सगळं तुम्ही केलंय?”

“कुणीही कबूल करत नाही..”

“ए भड****नो….तुम्ही केलंय का हे? गां**त दम असेल तर बोला ना..”

“ओ मॅम, हा आम्हीच केलंय…. सालं पोरीची जात…रात्री अंधारात चालली होती रस्त्याने…आम्ही मर्द लोकं… किती संयम ठेवणार..”

“तुमच्या संयम ची….”

तेजु खिशातून कात्री काढते आणि एकेकाची उतरवून….खाट…. खाट…..

पोलीस स्टेशन रक्तबंबाळ होतं….

“आता आयुष्यभर संयम बाळगाल… असंच चढायचं फाशीवर आता…आम्ही जाहिरात करू…नपुंसक लोकांना चढवलंय फाशीवर….”

आरोपी वेदनेने कळवळतात….

“काय झालं? मर्दनगी कुठे गेली आता?”

पोलीस स्टेशन मधले सर्वजण थरथर कापत असतात..

“काय पाहिलंत तुम्ही?”

“मुख्यमंत्री मॅम ने येऊन फक्त चौकशी केली..”

“Good…यापुढे असं कुणी केलं तर त्याला हीच शिक्षा करायची…कायद्यांत अडकला तर मी स्वतः कायदा बदलून देईल…समजलं??”

असं म्हणत एक झुंझार व्यक्तिमत्त्व जनतेच्या कल्याणासाठी टोकाच्या भूमिकेवर जाऊन न्याय करतं… आणि जनतेला तेजु च्या रूपाने एक मासिहा मिळतो..

समाप्त

7 thoughts on “धुरा (भाग 8 अंतिम) ©संजना इंगळे”

  1. अनिल कपूरचा नायक सिनेमा मराठी भाषेमधे वाचते आहे असे वाटले.

    Reply

Leave a Comment