धर्मबंधन-1

जेनिफर आणि नर्मदा,

दोघी बालपणीच्या मैत्रिणी,

नावात इतकी तफावत आणि मैत्रिणी?

होय, कारण स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता,

नर्मदाचे वडील शिकलेले, इंग्रजांच्या हाताखाली कामाला,

पगार चांगला होता, तिथलाच एक इंग्रज सहकारी,

त्याची आणि नर्मदेच्या वडिलांची चांगली मैत्री,

त्यांची मुलगी जेनिफर आणि नर्मदा, दोघी छान मैत्रिणी बनल्या,

राहणीमान, आचार विचार, सगळीच तफावत होती,

पण तरीही सूर जुळले,

नर्मदा तिला भारतीय पद्धतीचं जेवण घेऊन जायची, जेनिफरला फार आवडायचं,

जेनिफर तिच्या देशातून आणलेल्या वस्तू दाखवायची, नर्मदेला भुरळ पडायची,

भाषा जमत नव्हती, पण हळूहळू बोलण्याइतपत नर्मदेने इंग्रजी आणि जेनिफरने हिंदी शिकून घेतलं,

जेनिफरचं आयुष्य बघून नर्मदेला खूप कौतुक वाटायचं,

जेनिफरला कमालीचं स्वातंत्र्य होतं,

नर्मदेच्या घरात मात्र शिस्तीचं वातावरण,

संध्याकाळी 7च्या आत घरात, अंगभर कपडे, घरातील कामं येणं हे नियम,

याउलट जेनिफरला कसलंही बंधन नव्हतं, हवे तसे कपडे, हवं ते करणं, पार्टी, फिरणं..सगळं मनासारखं..

नर्मदेला हेवा वाटे,

भाग 2

धर्मबंधन-2

Leave a Comment