दुनिया गोल है-2

सुनबाईला ते शब्द खूप लागले, रडकुंडीला आली..

तिलाही सूनवता आलं असतं पण तिला मनापासून हा व्यवसाय करायचा होता, थोडीशीही चूक झाली तर थोडाफार जो सपोर्ट मिळतो तोही बंद झाला असता..

तिने हातातलं काम बाजूला ठेवलं आणि सासूबाईंची काम पूर्ण करून दिली..

पुन्हा आपल्या कामाला लागली,

तिची धावपळ बघून सासूबाईंना समाधान वाटलं,

तिलाच हौस होती, आता भोग..! असा त्यांचा अविर्भाव होता..

त्या तयारी करून निघून गेल्या..

निमा एक चांगली शिकलेली मुलगी,

मुलांच्या शाळेच्या वेळा, खाण्यापिण्याच्या वेळा, कलासच्या वेळा यामुळे इच्छा असूनही ती नोकरी करू शकत नव्हती,

पण मनापासून काहीतरी करण्याची तिची धडपड सुरू असायची..

अश्यातच तिने बेकिंगचा कोर्स केला,

तिला छान छान केक आणि इतर डेझर्ट्स बनवता येऊ लागले,

यालाच आपला व्यवसाय बनवायचा असं तिने ठरवलं..

हळूहळू एकेक ऑर्डर घेऊ लागली,

घरी विरोध होता,

कारण ती त्यात गुंतली की घराकडे दुर्लक्ष होणार हे त्यांना वाटत होतं..

पण तिने समजावून, खात्री देऊन कशीबशी परवानगी मिळवली,

तिकडे सासुबाई कार्यक्रमात छान गुंग झालेल्या,

त्यांची मैत्रीण, जिचा नवरा काही वर्षांपूर्वीच सोडून गेलेला त्या मैत्रिणीच्या नातवाचा वाढदिवस होता,

ती मैत्रीण स्वावलंबी होती, सगळं एकटीनेच सांभाळलं होतं,

नातवाच्या वाढदिवसासाठी केक आणि कपकेक आणण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती,

कार्यक्रमात सासुबाई आणि त्यांची मैत्रीण गप्पा मारत होत्या,

तोच त्या मैत्रिणीची सुनबाई तिथे आली,

आई अहो केक केव्हा येणार आहे? कार्यक्रम सुरू होईल आता..

अरे बापरे, अजून आला नाही?

आई तुम्ही पण ना, सांगत होते की ती जबाबदारी मी घेते, पण ऐकलं नाही..

सुनबाई मैत्रिणीला ऐकवून गेली,

आपल्या मैत्रिणीला असे बोल लावलेले सासूबाईंना आवडलं नाही,

त्यांना खूप राग आला, पण काही बोलू शकत नव्हत्या,

मैत्रिणीने त्या ऑर्डर वाल्याला फोन लावला, तो काही उचलेना..

मैत्रिणीला घाम फुटला,

भाग 3

दुनिया गोल है-3

2 thoughts on “दुनिया गोल है-2”

Leave a Comment