“सुनबाई, मला एका कार्यक्रमाला जायचं आहे, माझी साडी छान प्रेस करून दे आणि दुकानात जाऊन एखादं गिफ्ट घेऊन ये..”
हे ऐकून निमा चांगलीच पेचात पडली,
तिला आज एक मोठी ऑर्डर मिळाली होती,
ती वेळेत पूर्ण करायची होती,
सासूबाई कार्यक्रमाला जाणार हे तिला माहीत होतं,
त्यामुळे त्या गेल्या की भरपूर वेळ मिळेल या हिशेबाने तिने प्लॅनिंग केलेलं,
पण सासूबाईंनी वाढवा कामं दिली,
त्यात वेळ जाणार होता,
आणि ऑर्डर पूर्ण करायला फक्त दीड तास शिल्लक होता,
तिला सासूबाईंना कसं सांगावं कळत नव्हतं,
ती हिम्मत करून म्हणाली,
आई ती सिंथेटिक साडी छान दिसते ती नेसा की,
आणि गिफ्ट पेक्षा पैशाचं पाकीट दिलेलं बरं राहील..
सुनबाई आळशीपणा दाखवतेय हे लक्षात न येण्याइतपत सासूबाई भोळ्या नव्हत्या,
त्याही हट्टीपणा करू लागल्या,
नाही मी तीच साडी नेसणार, आणि गिफ्टच नेणार..आवर पटकन,
अहो सासूबाई ऐका ना, मला आज एक मोठी ऑर्डर पूर्ण करायची आहे, वेळेत दिली नाही तर मोठी अडचण होईल..
मोठी बिझनेसमन लागून चालली… स्वतःला काय समजते काय माहित..सासूबाई पुटपुटल्या तेही तिला ऐकू जाईल अश्या स्वरात..
सासुबाई प्लिज, फक्त आजच्या दिवस…
आजचा दिवस परत येणार आहे का? माझ्या जवळच्या मैत्रिणीकडे कार्यक्रम आहे आणि तिथे मी व्यवस्थित गेले नाही तर माझीच नाचक्की ना ! तुला तेच पाहिजे असेल..आणि कशाला हे उद्योग करत बसतेस? तुला तुझ्या नवऱ्याने आणि मीही सांगितलेलं की घरातलं फक्त नीट बघ, बाकीच्या कामांना वेळ मिळणार नाही..पण तूच गयावया केलेल्या…घरातलं सगळं नीट बघून हे करेन..आता काय झालं? तुला परवानगी दिली तेच चुकलं..
*****
भाग 3