दडपण-2

“अगं तुला काय पाहाड उचलून न्यायचाय का? उगाच टेन्शन घेते, मी असतो ना खरंच टेन्शन नसतं, पण मला बाहेरगावी जाणं भाग आहे…ऑफिसमधून तशी ऑर्डर आलीये..”

आता काही पर्यायच नसल्याने ती अजूनच घाबरली,

पण प्रयत्न करत होती,

आरशासमोर उभी राही…

तोंडातून शब्द बाहेर पडला की स्वतःलाच हसू येई,

मग तिकडे असं केलं तर आपलंच हसू होईल या विचाराने परत गंभीर होई,

दोन शब्द बोलली की स्वतःलाच शिव्या देई..

“हे काय बोलणं झालं? ह्ये…”

पोरगं दाराआडून गम्मत पाहायचं,

ती अजून चिडायची,

“तुझ्यामुळे नालायका…तुझ्यामुळे ही वेळ आली माझ्यावर..”

काय चुकलेलं तिचं?

तरी तो तिलाच रागवायचा,

“पोराने नाव काढलं म्हणून तुला बोलायला लावताय..अन म्हणतेस तुझ्यामुळे..”

“पुढील वर्षी नसता काढता आला का नंबर? यावर्षीच काढायचा होता का?”

दोघेही गमतीनेच बोलत,

खरं तर मुलाच्या यशाने तिला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या,

फक्त हे एक शिवधनुष्य पेलणं अवघड होतं तिच्यासाठी…

त्याने तिला जवळ बसवलं, भरपूर बोलला तिला..

“काय क्षुल्लक गोष्टीचं टेन्शन घेतेय? ही फार मोठी गोष्ट आहे का? मी काही वाक्य लिहून देते ती पाठ कर आणि बोल..”

तिला हायसं वाटलं,

त्याने लिहून दिलं..

“इथे बसलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज मी जे दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती..”

तो शाळेत असतांना त्याने लोकमान्य टिळकांचं बोललेलं एकमेव भाषण, त्यातल्या ओळी त्याला आठवल्या आणि तो स्वतःवरच खुश झाला..

दडपण-3

1 thought on “दडपण-2”

Leave a Comment