थोडाही उशीर झाला असता तर….!!!

शाळेत दहावीच्या मुलांच्या उत्तरपत्रिका तिच्याकडून गहाळ झाल्या होत्या, सगळे आरोप तिच्यावरच आले होते..वर्गात पेपर चेक करत असताना लक्षात आलं की अमुक एका शाळेच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत, तो गठ्ठा तिच्याकडेच होता. मग चौकशी, मुख्याध्यापकांकडून चौकशी, पुढे काय काय वाढून ठेवलेलं आहे याची तिला कल्पना दिली गेली. शाळेतील स्टाफ तसा समजदार होता, त्यांनी तिला धीर दिला पण तिचं मन काही थाऱ्यावर नव्हतं.

घरी नवऱ्याला सांगू की नको या चिंतेत ती होती. तिचं वागणं घरी एकदम बदललं. तिचं सगळया कामातून लक्ष उडालं होतं.

रात्री मोहित खोलीत आला आणि तिने त्याच्याकडे एक नजर टाकली, त्याचं लक्ष मोबाईल स्क्रीन कडे होतं… त्याने भावना कडे पाहिलही नाही, मोबाईल मध्ये व्हिडीओ बघत तो झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी त ठरवते की हे संकट आपणच आपलं पेलायचं, उगाच कुणालाही त्रास द्यायचा नाही. तिने ही गोष्ट मनातच दाबून ठेवली. पण मधेच वाटायचं की मोहित ला सगळं सांगून टाकावं.

दुसऱ्या दिवशी मोहित पार्टी ला गेला तो रात्री उशिरा घरी आला…आल्या आल्या बेडवर झोपला..

“मोहित…तुला एक सांगायचं आहे..”

“मोहित…मोहित??”

मोहित न ऐकताच झोपी गेला. भावनाच्या मनातली खदखद अजून वाढली. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाक करताना तिचं चित्त ठिकाणावर नव्हतं… भाजीत मीठ टाकायचं राहीलं, कपडे वाळत टाकायचे राहिले…ते पाहून सासुबाईचे टोमणे सुरू झाले..

“करा अजून नोकऱ्या करा…घरात लक्ष नको द्यायला यांना…”

भावना ची मनस्थिती अजून बिघडली…

आता काहीही झालं तरी मोहित ला सांगायचं असं ठरवलं..

रात्री मोहित खोलीत हेडफोन टाकून पडला होता…

“मोहित माझ्याकडून दहावीचे पेपर गहाळ झालेत..”

मोहित ने फक्त मान हलवली..हेडफोन मुळे त्याला ऐकू गेलं नव्हतं… फक्त काहीतरी प्रतिक्रिया द्यायची म्हणून त्याने मान हलवली..

इतक्या दिवसांपासून भावना खूप टेन्शन मध्ये होती हे त्याला दिसलंही नाही? घरी आल्यावर निदान बायकोशी 2 शब्द बोलायचीही त्याला गरज वाटली नाही? आज काय झालं, कसा दिवस गेला हा संवाद जरुरी वाटला नाही?

जर नसेल तर मग आज आपण मानसिक स्वास्थ्याच्या ज्या गोष्टी करतोय, त्या महिलांच्या बाबतीत कितपत जपल्या जाताय?

समोरचा ऐकून घेणारच नसेल, ऐकलं तरी समजून घेणार नसेल, आणि समजलं तरी मख्ख बसणार असेल तर ही घुसमट दाखवावी तरी कुणाला???

भावना वर दबाव वाढत गेला…पोलीस, शिक्षा, दंड असे शब्द ऐकून भावना पुरती कोलमडली…आज जीवन संपवणार असं ठरवून ती घरी येत असतानाच तिला फोन येतो..

“मॅडम पेपर सापडलेत, शिपायाने चुकून ते दुसऱ्या सेट मध्ये ठेवले होते…”

भावना च्या मनातलं मळभ एकदम दूर झालं… पण हा फोन यायला थोडा जरी उशीर झाला असता तर???

म्हणून, कुणी आपलं मन मोकळं करत असेल तर ऐकायची तयारी ठेवा, समोरचा कुठल्या मनस्थितीत आहे हे ओळखायला शिका…निदान नवरा बायकोने तरी एकमेकांशी संवाद ठेवावा..

__________
#भाजणीच्या_चकल्या बनवा 15 मिनिटात.
घरगुती आणि सुरक्षितरित्या बनवलेल्या “माहेश्वरी” चकली भाजणी पिठाच्या चकल्या, पूर्ण रेसिपी सह. चकली शिवाय फराळ पूर्ण कसा होईल? आता बनवा झटपट चकल्या अगदी सोप्या. घरपोच पीठ मिळवा अगदी सहज. खालील नंबर वर तुम्ही व्हाट्सअप्प/कॉल करू शकता.
1 kg- 300 रुपये फक्त.आजच संपर्क करा.
9421609656
9834029424
 पूर्ण रेसिपी 

3 thoughts on “थोडाही उशीर झाला असता तर….!!!”

  1. संवाद दोन्ही बाजुंने झाला तरच तो सुसंवाद होतो. आम्ही ऐकायलाही तयार आहोत आणि बोलायलाही पण समोरच्या व्यक्तीला ते महत्त्वाचे वाटतच नसेल तर काय करायच ?

    Reply
  2. You actually make it appear really easy along with your presentation but I find this topic
    to be really something that I feel I would never understand.
    It sort of feels too complex and very extensive for me. I
    am taking a look forward in your next put up, I’ll attempt
    to get the grasp of it! Escape room

    Reply

Leave a Comment