तू ही हकीकत (भाग 5)

भाग 1
https://www.irablogging.in/2020/07/1.html

भाग 2
https://www.irablogging.in/2020/07/2.html

भाग 3
https://www.irablogging.in/2020/07/3.html

भाग 4
https://www.irablogging.in/2020/07/4.html

(खूप उशिराने ही पोस्ट टाकत आहे त्याबद्दल मनापासून माफी मागते, पुढील भाग रोज एक मिळत जाईल याची हमी देते)

“सासूबाई??”

“स्वरा, मला सर्व समजलं आहे…ईशिका आणि आशिष मध्ये काय चाललंय सगळं कळतय… पण हे आम्ही कधीच स्वीकारू शकत नाही..”

“आई, मला असं वाटतं की या दोघांच्या प्रेमाच्या मध्ये मी आलीये..”

“उलट तुमच्या प्रेमात ईशिका आलीये…लहानपणापासून तिला बघतोय आम्ही, आशिष ची मैत्रीण यापलीकडे तिची काहीही पात्रता नाहीये. मैत्रिणीची मुलगी म्हणून जेवढा जिव्हाळा वाटतो तेवढा पुरेसा आहे…त्यापुढे जाऊन तिला या घरात आणायचं, मला नाही पटत.”

“तुम्हाला खरं सांगू आई? आशिषला मी चांगली ओळखते, त्याचा लहरी आणि भावनिक स्वभाव आहे, ईशिकाला त्याने पाहिलं आणि जुनी ओळख दाटून आली त्याच्या मनात..”

“मग हे सगळं का करतेस?”

“आशिषच्या मनातून एकदा निघून गेलं की त्याला आयुष्यभर सल राहणार नाही, माझा माझ्या प्रेमावर विश्वास आहे. त्याला लवकरच खरं प्रेम आणि केवळ ओढ यातला फरक कळेल, त्यासाठी ईशिकाला इथे राहणं भाग आहे. नाहीतर मी कर्तव्याचा धाक दाखवून तिला कायमचं दूर केलं असतं पण आशिष आयुष्यभर ही सल मनात घेऊन जगला असता. त्याचा गैरसमज दूर होण्यासाठी हे महत्वाचं आहे..”

“तुला तुझ्या प्रेमावर विश्वास असेल तर…ठीक आहे..”

स्वरा ला तिच्या प्रेमावर विश्वास होता. आशिष ला ती त्याच्यापेक्षा जास्त ओळखत होती. यावेळी एक बायको म्हणून नाही तर एक मैत्रीण बनून त्याला आयुष्याचं सत्य तिला दाखवून द्यायचं होतं.

ईशिका ने आता नवीन कट रचला, खुशी ला तिने आपल्या बाजूने ओढायचा प्रयत्न केला. खुशी ला भरपूर खेळण्या आणून दे, भरपूर चॉकलेट्स दे, मोबाईल वर नवीन गेम लावून दे असं या ना त्या प्रकारे ती खुशी ला आपलं करायची संधी शोधत होती. तिला माहीत होतं की खुशी हा आशिष चा विक पॉईंट आहे, तिला आपल्या बाजूने केलं की काही अडचण राहणार नाही.

ईशिका आता घरात नवीन कट रचायला लागली, एके दिवशी आशिष च्या वडिलांना अचानक त्रास व्हायला लागला…डॉक्टर कडे नेलं तेव्हा समजलं की त्यांना चुकीच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या…आशिष घरी आल्यावर..

“स्वरा….कुठे आहेस…”

“आलात? बाबा कसे आहेत?”

“बाबांना तूच गोळ्या द्यायची ना? तुला जड झालेत का माझे आई वडील? का चुकीच्या गोळ्या दिल्या??”

“अहो काय बोलताय, मी असं कसं करेल??”

“आजवर तूच बाबांना गोळ्या देत आली आहेस…तुझ्याशिवाय कोण करेल हे??”

ईशिकाचा कट यशस्वी होणार होता, आशिष च्या मनात स्वरा बद्दल कटुता भरून तिला त्याच्यापासून दूर करायचं होतं..

“काय हे आशिष, अरे काका काकूंना मी अगदी आई वडीलांप्रमाणे मानते, मी असं कधीच वागली नसती…”

“तुमची हिम्मत कशी झाली स्वरा ला बोलायची? त्या गोळ्या मी दिल्या होत्या यांना..स्वरा असं काही करेल असं वाटलंच कसं तुम्हाला??”

सासूबाई येऊन सर्वांना ओरडतात…आशिष खजील होऊन निघून जातो, ईशिका ला समजतं की आशिष ची आई स्वरा ला वाचवण्यासाठी मुद्दाम खोटं बोलतेय…

पण ईशिका कात्रीत सापडली, एक तर गोळ्या तिने बदलल्या हेही तिला सांगता येत नव्हतं आणि सासूबाई चुकीचं बोलताय हेही तुला सिद्ध करता येणार नव्हतं… तिचा प्लॅन फसला..तीही तिथून निघून गेली..

स्वरा रडत रडत सासूबाईंना म्हणाली,

“आई …गोळ्या मीच दिल्या होत्या हो…तुम्ही का स्वतःवर ओढवलं..”

“खूप निरागस आहेस तू स्वरा, तुला लोकांचे डावपेच कळत नाही..”

“म्हणजे?”

“गोळ्या ईशिका ने बदलल्या होत्या..”

“काय??”

स्वरा चिडते, ईशिका इतक्या खालच्या थराला जाऊ शकते??? माझ्या घरातल्या माणसांच्या जर ती जीवावर उठत असेल तर नाही राहू देणार मी तिला इथे…

इतक्यात खुशी येते..

“आई..मला आईस्क्रीम पाहीजेय..”

“बाळा काल खाल्लं ना तू? सर्दी होईल बाळा, आणि तुझे दात पण किडायला लागलेत बघ.”

“नाही…मला पाहिजे म्हणजे पाहिजे..”

“खुशी बाळ हट्ट करू नकोस..”

“मी इशू मावशीलाच सांगते थाम्ब…ती लगेच देते…तीच माझी आई पाहिजे होती..”

हे ऐकून स्वराच्या डोक्यात एक तीव्र सनक गेली… ईशिका खुशीलाही आपल्या जाळ्यात ओढू पाहतेय हे तिला समजलं…पण तिने मन घट्ट केलं…

आशिष आता ऑफिस मधून उशिरा येऊ लागला होता..ईशिका आणि तो परस्पर बाहेर फिरायला जात…

“आशिष…तुला नाही वाटत तुझ्याकडे जे आहे त्यापेक्षा तू जास्त डीझर्व करतोस ते?”

“म्हणजे??”

“अरे लंडन ला इतके ढिम्म मुलं येऊन स्वतःचं नाव कमावताय…आणि तुझ्यासारखा हुशार मुलगा इथे राहून काय करतोय?? हे बघ…लंडन ला काय काय आहे ते..”

ईशिका त्याला लंडन बद्दल भुरळ पाडते, तिथे आयुष्य कसं ऐशो आरामात आणि एका स्टॅंडर्ड ने जगता येतं हे त्याला दाखवून देते…आशिष च्या मनात हळूहळू लंडन ला जायची ईच्छा निर्माण होते..

“आशिष..तिथे माझं सगळं आहे…घर, गाडी…तुला फक्त तिथे येऊन काहीतरी काम करायचं आहे…तुला काहीच स्ट्रगल करावं लागणार नाही..”

आशिष आता लंडन च्या स्वप्नाने पूर्णपणे भारून जातो, त्याला स्वरा, खुशी, आई वडील काहीही दिसत नाही…लंडन चं स्वप्न केवळ ईशिका पूर्ण करू शकते हे त्याला माहीत होतं

क्रमशः

Leave a Comment